दुगांव येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा स्मृतिदिन साजरा
दुगांव ता. चांदवड येथे श्री रामज्योती प्रतिष्टान दुगांव यांच्याकडून महात्मा ज्योतीराव फुले यांचा १३३ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला प्रसंगी महात्मा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यास रत्नाकर गांगुर्डे निलेश साहेबराव आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली, कार्यक्रमास गावातील लोकनियुक्त सरपंच संजय गांधी, महेश सोनवणे,उपसरपंच निलेश सोनवणे, नवल सोनवणे, साहेबराव आहेर, किरण क्षीरसागर, अरुण सोनवणे, पोपट सोनवणे बाळासाहेब सोनवणे,अर्जुन गांगुर्डे, शाम गुंजाळ, आरिफ शेख,गोटीराम सोनवणे,तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

