शाळेचे गेट उघडू दिले नाही
चांदवड – वाद ता चांदवड येथील जिल्हा परिषद शाळेला सहा महिन्यांपासून शिक्षक नसल्याने पालकांनी आज शाळेचे गेट उघडू दिले नाही. शिक्षक देणार नसाल तर आमच्या मुलांचे दाखले द्या अशी मागणी पालकांनी केली आहे.
वाद येथे पहिली ते पाचवी पर्यंत चे पाच वर्ग असून एकूण नव्वद च्या आसपास विद्यार्थी संख्या आहे. येथे सहा महिन्यांपासून फक्त दोनच शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. तिन शिक्षकांच्या जागा मंजूर असून एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर सहा महिन्यांपासून एक जागा रिक्त आहे.
सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती सह पालकांनी आतापर्यंत अनेक वेळा शिक्षक देण्याची मागणी केली आहे. तरीही शिक्षक मिळाला नसल्याने आज पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आजच्या आज शिक्षक दिला नाही तर पालकांनी आपल्या मुलांचे दाखले शाळेतून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक मिळावा या मागणीसाठी दिवाळीनंतर आज जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आज पालकांनी वाद येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावलं आहे. यावेळी सरपंच प्रविण आहेर , ग्रामपंचायत सदस्य अंकुश आहेर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाडे, उपाध्यक्ष योगेश पवार, भाऊसाहेब आहेर, कारभारी शिंदे, बाळु खताळ, नंदु देवरे, खंडू गोरसे, बाळु भालेराव, केशव हारपडे, शिवाजी कुंभार्डे, योगेश पवार, सागर सोनवणे, दिनकर आहेर, विकास आहेर ,पिराजी भालेराव , योगेश घाडगे, किरण खताळ आदींसह पालक उपस्थित होते.

