न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने कार्यकत्यांमध्ये उत्साह
चांदवड – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळयाप्रकरणी न्यायालयाने निदोष मुक्कता केल्याने त्यांचा मुंबई आग्रारोडवरील हॉटेल राजश्री येथे कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस व समता परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील मालेगाव व नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीने पाऊस झाल्याने छगनरावजी भुजबळ हे पाहणी दौऱ्यावर जात असतांना चांदवड येथे कार्यकर्तेयांनी त्यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन केला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली त्यावर त्यांनी सांगितले की जनता माझ्या पाठीशी आहे व जनतेच्या आशीर्वादाने मला कोर्टाने मुक्त केले असे सत्कार समारंभ वेळेस बोलले
यावेळी माजी उपसभापती व समता परिषदेचे तालुका अध्यक्ष यु.के.आहेर, चांदवड तालुका कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, मजूर संघाचे संचालक शिवाजी कासव, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ आहेर, समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस सतिश सोनवणो,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी सुनीलतात्या कबाडे, अमोल खैरे, सुनील सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, बाळासाहेब पाटील, महेश माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके, समता परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष डॉ.अरुण निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस विजय जाधव, तुकाराम सोनवणे, रिजवान घासी, केशव खैरे, अशोक खैरे, अशोक जाधव, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव , उपनिरीक्षक गजानन राठोड, पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

