चांदवडी रुपय्या पुरस्कार जाहीर
चांदवडी रुपय्या साहित्य कलारसिक मंडळ दरवर्षी समाजातील कार्यशील घटकांचा सन्मान करत असते. ‘चांदवडी रूपय्या’ मंडळाच्या वतीने दर वर्षी दिले जाणारे यंदाचे पुरस्कार सचिव सागर जाधव जोपुळकर व अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर जाहीर केले आहेत.


कवी संजय गोरडे
साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देत असलेले आणि ज्यांची प्रेरणा समाजातील इतर घटकांनी घ्यावी असे नाशिक येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, कामगार कवी संजय गोरडे ( सौभद्र ) यांना “चांदवडी रुपय्या साहित्य प्रेरणा पुरस्कार”
अश्वमेध प्रतिष्ठान
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा अश्वमेध प्रतिष्ठान या ग्रुपला त्यांनी डोंगरमाळावर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करणे, कोरोना काळात रुग्णांना जेवण पुरवणे व इतर कार्याची दखल घेऊन त्यांना “चांदवडी रुपय्या सामाजिक प्रेरणा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे.
पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असणार आहे.
पुरस्कारांची निवड रवींद्र देवरे, डॉ राजेंद्र मलोसे, शीला पाटील, हर्षल गांगुर्डे, सविता दरेकर, संदीप गुजराथी, सोमनाथ पगार, जनार्दन देवरे, सुशीला संकलेचा व सविता दिवटे यांनी केली.
या प्रसंगी वंदना गांगुर्डे, वाल्मिक सोनवणे, बाळा पाडवी, डॉ तुषार चांदवडकर, शिवराज पाटील, देव हिरे, अजित अहिरे, रुपाली घमंडी, शैलजा जाधव, शांताराम हांडगे, प्रफुल्ल सोनवणे, अमर ठोंबरे, हेमांगी बर्वे, सुदीप गुजराथी, रितू जाधव, दिगंबर शेळके, रुपाली खैरणार आदींनी स्वागत व अभिनंदन केले.
पुरस्कार वितरण दीपावली दरम्यान होईल, असे चांदवडी रुपय्याचे अध्यक्ष रावसाहेब जाधव व सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी सांगितले.




मी कवियेत्री पल्लवी बाबासाहेब दाभाडे (विद्यार्थिनी)
कवयित्री पल्लवी बाबासाहेब दाभाडे :
शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक, कला हे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य ,
कोरोना काळामध्ये गोरगरिबांना सॅनिटायझर मोफत वाटप.
तसेच कोरोना काळामध्ये गोरगरिबांना अन्नधान्य वाटप.
शब्दगंध समूह प्रकाशन विद्यार्थी प्रिय शिक्षक संघटना ग्रंथ मित्र युवा मंडळ आयोजित महिला गौरव पुरस्कार .
पुस्तक प्रकाशन योजनेत सहभागी होऊन हजार कवींच्या हजर कवितेत सहभाग पुरस्कार व सन्मानपत्र
मनोरंजन काव्यवाचन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाने बक्षीस
रोज विविध प्रकारे कविता करण्याची एक छंद आवड.
शिक्षणात प्रथम क्रमांक तसेच पुरस्कार
नृत्य स्पर्धेमध्ये , गायन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अनेक पुरस्कार प्रमाणपत्र
शब्दगंध समूह प्रकाशन आयोजित आयोजन स्पर्धेत स्त्री एक शिल्पकार ,खरंच मैत्री किती गोड असते ना , मी स्त्री बोलतीये. हे पुस्तक प्रकाशित
शेतात राब राब राबणाऱ्या महिलांना आयुर्वेदिक सॅनिटायझर कोरोनाच्या काळात स्वतःच्या हाताने माझ्या गावातील तसेच आसपासच्या गावातील गरीब होतकरू मुला-मुलींना शेतात राबराब राबणाऱ्या गरीब होत करू महिलांना ते सॅनिटायझर वाटप