नांदगाव ला पाचव्या दिवशीही पावसाने झोडपले
नांदगाव /राजेंद्र तळेकर
नांदगाव तालुक्यात आज पाचव्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच शेती पिकांची वाताहात सुरू झाली आहे काल शुक्रवार रोजी ,नांदगाव ,जगधने वाडा ,जोंधळ वाडी, साकोरा परिसरात पावसाने हजेरी लावली आज शनिवार दुपारीच मनमाड ,एकवई ,माळेगाव ,भालूर,लक्ष्मीनगर ,मांडवड, मोरझर ,दहेगाव, पिंजरवाडी, नांदगाव परिसरात पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतीपिकांचे आता मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
शेतात असलेली पिके आडवे पडु लागली आहे तर सोंगलेली बाजरी सोयाबीन कांद्याची रोपे व इतर भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू झाली आहे यामुळे शेतकरी वर्ग पुरता हादरुन गेला असून मागील जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे अद्यापही पंचनामे झाले नसून कर्मचारी वर्ग अपुरा त्यामुळे पंचनाम्याचे काम दिरंगाईने सुरू आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आता त्रस्त झाला आहे त्यातच विमा कंपनीचे लोक अडेलतट्टू भूमिका घेऊन नको ते कागद शोधून आणायला सांगत आहे त्यामुळे या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करायची कशी याची चिंताही शेतकऱ्याला लागून राहिली आहे एकंदरीतच नांदगावकरांवर वरुणराजाने मायेचे पांघरून धरलयाने झाल्याने शेतकरी वर्ग हा तास झाला आहे

