[masterslider id="2"]
क्रीडा संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडाळी बु हायस्कूलचा विद्यार्थी अथर्व थोरात याची नवोदय विद्यालयात निवड

यांनी लिहिलेले राजेंद्र तळेकर

वडाळी बु हायस्कूलचा विद्यार्थी अथर्व थोरात याची नवोदय विद्यालयात निवड

वडाळी बु हायस्कूलचा विद्यार्थी अथर्व थोरात याची नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल सत्कार करताना मान्यवर

मांडवड(प्रतिनिधी)
नांदगाव तालुक्यातील वडाळी बु येथील ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघ वडाळी बु संचलित माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्या मंदिर वडाळी बु विद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी चि. अथर्व नंदू थोरात याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली.
अथर्व हा विध्यार्थी अतिशय बुद्धिमान,हुशार,संयमी असून अपेक्षेप्रमाणे त्याला यश मिळाले व त्याची निवड झाली.त्यास त्याचे शिक्षक आई वडील आणि विद्यालयातील शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. त्याची जिद्द,चिकाटी,एकाग्रता,अभ्यासूवृत्ती या गुणामुळे त्यानी उत्तुंग भरारी मारून यशश्री मिळविली.
या यशाबद्दल ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संघ वडाळी बु संस्थेचे अध्यक्ष डॉ.सागर भिलोरे, सेक्रेटरी पोपटराव कोरडे,उपाध्यक्ष मधुकर नंद,संचालक तुळशीराम पाटील, आदी नी पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यालयाचे प्राचार्य एम.ए. वाघ व सर्व शिक्षक ,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी ही हार्दिक अभिनंदन करून उज्जल यशासाठी शुभेच्छा दिल्या.अथर्व चे सर्व समाज माध्यमांमधून कौतुक व अभिनंदन होत आहे.

लेखकाबद्दल

राजेंद्र तळेकर

एक टिप्पणी द्या