आदिवासी माधोळ लोककलेतील सांस्कृतिक आविष्कार
आदिवासी समाज हा पुर्वीपासून डोंगराळ भागात, दरीखोरीत, घनदाट अरण्यात सानिध्यात लोकवस्ती करुन आदिवासी हा जीवनाचा पाया मानून आजही गुन्यागोविंदाने जीवन जगत आहेत. त्यात श्रम, समूह, आणि सहकार्य याच मानवी जीवनमुल्यांच्या आधारित जीवनातील प्रत्येक व्यवहार होत आहे त्यात सण उत्सव आणि लोककला हे महत्त्वाचे पैलू मानले जाते तसेच लोककलेच्या माध्यमातून आजही आदिवासींचे प्रापंचिक , सामाजिक जीवन हे लोकगीतांतून आविष्कृत होत आहे खरे सांस्कृतिक आविष्कार हा निसर्गाचा नियम आहे .या जीवनाचे दर्शन घडवणारा वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणजे माधोळ हा सांस्कृतिक नृत्य प्रकार आहे समाज जागृती करण्याची कला ही माधोळ कलेत दडली आहे त्याची सुरुवात कलेच्या प्रार्थनेपासून होते .
आजो गाजो रे माझे कर्मार
राणी वणी रे माझे कर्मार
धान पेरजो माझे कर्मार
रास वसव रे माझे कर्मार
अशी निसर्ग संस्कृतीला मनोभावे प्रार्थना करुन पुढे गायन व वगनाट्याला सुरुवात होते .
मुलगा : अवंद जास्त काय पेरायचं
बाप : अवंद भात शेती करु
मुलगा : काहालं होडा
बाप : भात चांगला पिकील त्यातील जराक विकू अन् जराक खायाल ठेवू
गायन : पोशा रडं काय वं साठी पोशा रडं भाकरी साठी
मुलगा : मला पैसा दे आता भाकर खाल्ली
गायन : पोशा रडं काय वं साठी पोशा रडं पैशासाठी
आदिवासी माणूस हा विनातक्रारी जीवन कंठणारा आजही दुर्गम भागातील या समाजाचे साधेपणाचे आणि निसर्गावलंबी हे स्वाभाविक आहे त्याचा प्रत्यय लोकगीतांतून आला आहे.
काकडी कुवा घरोघरी यंवा
उलटुन पालटून माराव्या जुवा
आबाय का धाबाय करावं पाटलीन
हे वाट जाशी नको
ते वाटणं जाजो
वाघ रेकतो माझा जळतो
खालचे वाट जाशी नको
वरले वाटेनं जाजो
कोल्हा भुकतो माझा जीव जळतो
माधोळ कलेत एक आशावादी निर्भयता साकारलेली कलाकृती उजागर केली जाते. आदिवासी समाज संस्कृती सहकारी भावना जपलेली पुर्वीपासून डोंगराळ भागात वसलेली असताना निसर्गाच्या कुशीतील प्रत्येक घटकाला सहानुभूतीने स्पर्श करून जाणारी आहे वनस्पती सृष्टी बरोबरच पशू पक्ष्यांचे आवाज हे सहजपणे ओळखून अचूक अंदाज ठरवतात त्या निसर्ग सौंदर्यात आपली सुख दुःख विसरतो रानावनातील झाडा झुडपात जाणे ,रुप न्याहाळत हरुण जाणे ह्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान हे लोकगीतांतून आविष्कृत होते .
लुख्या पात्र
लुख्या म्हणजे मादळ कलेतील वगनाट्यात अभिनयासाठी रंगत आणणारा एक नायक असतो तो कलेमध्ये आदिवासी भाषाशैलीत , चेहऱ्यावरील स्मित हास्य आणि अक्राळविक्राळ स्वभावाने स्वरुप बदलत कलेत रंगत भरत डोळेभरून कला पाहणाऱ्या रशीकांना मनोरंजन करणारा प्रमुख पात्र असतो डोक्यावर पागोटे, अंगात फाटका सदरा मांडी पर्यंत आखुड पॅन्ड हा साधा पोशाख घालून हातात देवजाळीची पिवळी काठी , काठीच्या टोकाला बांधलेले अलगद गाठोडे त्यात कोंबडीचे लहान पिल्लू मधून मधून काठी खाली वर अलगद आपटल्याने पिलाचा होणारा चिव चिव आवाज कलेला अधिक रंजक वळणावर नेत असतो मोठाले ढोल, वाजवून गायनाचा गजर करीत
आदिवासी संस्कृती ही साहित्य प्रकाराबरोबरच लोककलेच्या माध्यमातून प्रशीध्द पावली आहे लोककला ही ह्या समाजाची अस्मिता आहे माधोळ ही लोककला सुरगाणा,पेठ ,कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, डहाणू तसेच पालघर परीसरात आजही सादरीकरण केली जाते .
सुभाष नारायण कामडी
संशोधक
मो 9579543308
माधोळ ही लोककला प्रत्यक्ष अनुभवुन तसेच जून्या लोक कलाकार मानसाकडुन माहिती घेऊन संशोधन केले आहे

