[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी यांची चांदवड नगरपरिषद,उपविभागीय अधिकारी कार्यलय,तहसील कार्यलय, यांना भेट चांदवड भाजप-शिवसेनेच्या च्या वतीने दिले पत्र

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

जिल्हाधिकारी यांची  चांदवड नगरपरिषद,उपविभागीय अधिकारी कार्यलय,तहसील कार्यलय, यांना भेट

चांदवड भाजप-शिवसेनेच्या च्या वतीने दिले पत्र

चांदवड शहरात यापूर्वी अनेक योजना मंजूर असून त्यात महत्वपूर्ण 24×7 पाणीपुरवठा ही योजना होय. ही योजना आता अंतिम टप्यात असून 98% काम पूर्ण झालेले आहे.परंतु शहरालगत चंद्रेश्वर महादेव मंदिर गड,श्री.रेणुका देवी मंदिर,श्री.गणेश मंदिर,बुखारी बाबा दर्गा असे अनेक तीर्थ क्षेत्र असलेले पुरातन मंदिर असून या ठिकाणी या सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेच्या शासकीय नियमानुसार पाणी देणे श्यक्य नसून यासाठी पर्यटन विभाअंतर्गत खास बाब म्हणून पाणीपुरवठा योजने करिता निधी उपलब्ध करून मिळावा तो वर्ग करावा असे पत्रव्यवहार भाजपा जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल यांच्या वतीने देण्यात आले तसेच चांदवड शहरातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुरातन रंगमहालाचे काम पूर्ण करणे बाबत देखील पत्र देण्यात आले.अशा या पुरातन व अहिल्याबाई होळकर यांच्या रंगमहालाचे काम बऱ्याच दिवसापासून चालू असून हे काम अद्यावत पूर्ण झालेले नाही. यामुळे हे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी देखील प्रशासनाकडून वेळोवेळी दखल घेण्यात यावी यामुळे चांदवड शहरातील पर्यटक यांची रंग महाल पाहण्यासाठी वाढ होईल व इतर महत्त्वाच्या व्यवसायिकांना देखील याचा फायदा होईल यासाठी आपण संबंधित या देखभाल-दुरुस्ती व पुरातत्त्व विभाग यांच्याकडून सदर बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यासाठी आज पत्रव्यवहार करण्यात आला. तसेच शिवसेना नगरसेवक यांच्या वतीने चांदवड शहरातील प्रशस्त स्मशानभूमी साठी चांदवड नगरपरिषद साठी निधी वर्ग करणे बाबत पत्र दिले त्यात, चांदवड नगर परिषद येथे पुरातन स्मशानभूमी असून येथे एकाच वेळी दोन ते तीन मृत व्यक्तीचा त्यांचा अंत्यविधी व इतर अनुषंगिक कामे करण्याकरिता वेळ किंवा जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा ऐन दुःखाच्यावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, या सर्व अडचणींचा लेखाजोखा समोर ठेवून आम्ही चांदवड नगर परिषद यांच्याकडून चांदवड शहरासाठी एक सुसज्ज अशी स्मशानभूमी उपलब्ध व्हावी यासाठी नगर परिषद अंतर्गत ठराव देखील करून कामे करण्याकरिता मा.भूषण कासलीवाल हे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष असताना मा.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडून विशेष प्रयत्नातून निधी उपलब्ध करून घेतला होता तो निधी वर्ग करून सर्व विषय मार्गी लावणे बाबत चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी नगरपरिषदेच्या सर्व विभागांची माहिती घेतली योजना कश्या पार पाडत आहे याबद्दल लेखाजोखा घेतला तसेच तहसील कार्यालय अंतर्गत असलेले नवीन धान्य गोडाऊन ची पाहणी करण्यात आली व येथील येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या. तसेच या वेळी चांदवड शहरातील ऐतिहासिक रंगमहाल याचीदेखील पाहणी केली व तेथे काम बंद पडले असून त्या विभागात लवकरात लवकर काम चालू व पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या यावेळी भूषण कासलीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व श्री रेणुका देवी चे दर्शन घेऊन चांदवड चा प्रशासकीय दौरा पूर्ण केला.या वेळी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख,प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल,तहसीलदार प्रदीप पाटील,मुख्याधिकारी अभिजित कदम,पुरातत्व विभागाचे अधिकारी,नगरपरिषदेचे काम संदर्भात पत्र देताना मा.नगरसेवक जगन्नाथ राऊत चामको बँकेचे संचालक सुनील डुंगरवाल सचिन खैरनार,अंकुर कासलीवाल,तर श्री रेणुका देवी येथे सुभाष पवार यांनी स्वागत करून सत्कार केला, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आरती आळे,वि.वि.धुमाळ,जतन सहाय्यक,सचिन पगारे, छायाचित्रकार इतर विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या