येवला (नारायण गुंजाळ ):= नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माहिती व तंत्रज्ञान सेलच्या जिल्हा ‘ संघटक सचिव ‘ पदी हर्षल डिक्कर व ‘ सरचिटणीस ‘ पदी प्रा.डॉ.संतोष वाघ नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले..
.यावेळी बागलाणचे मा.आमदार संजय नाना चव्हाण , युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम दादा कडलग , चांदवडचे माजी तालुकाध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर , भुषण शिंदे , अक्षय मोटकरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघटकसचिव हर्षलजी व सरचिरटणिस प्रा.डॉ.संतोषजी यांचे निवडी बद्दल अभिनंदन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे , उपाध्यक्ष प्रतीक रायते , गौरेश सूर्यवंशी , सरचिटणीस अनिल गोसावी , शुभम मुरकुटे , निखिल निकम , चिटणीस विशाल लभडे, सागर दरेकर, तुषार सानप , संघटक सचिव अक्षय मोरे , बागलाण तालुकाध्यक्ष प्रीतश भदाणे , निफाड पूर्व तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, येवला तालुकाध्यक्ष नारायण गुंजाळ आदी उपस्थित होते.

