[masterslider id="2"]
अध्यात्मिक संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

पानिपत म्हणजे मराठी पराक्रमाची शौर्य गाथा – डॉ.संदिप महिंद गुरुजी

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

पानिपत म्हणजे मराठी पराक्रमाची शौर्य गाथा – डॉ.संदिप महिंद गुरुजी

पानिपतचे युद्ध म्हणजे मराठ्यांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर लिहलेली शौर्यगाथा आहे.यामुळेच तर पानिपत युद्धांनंतर कुठलेही परकिय आक्रमण या भुमीवर झाले नाही.त्यामुळे पानिपत या शब्दाला कुचेष्टा न समजता पानिपत या शब्दांचा तमाम भारतीयांनी पानिपत या शब्दांचा अभिमान बाळगला गेला पाहिले असे प्रतिपादन पानिपत जागर अभियानाचे प्रमुख संदिप महिंद गुरुजी यांनी केले.
पुणे ते पानिपत ज्या मार्गांनी मराठी फौजा गेल्या त्या मार्गाने पानिपत जागर मोहिम गेली ९ वर्षापासुन डॉ़.संदिप महिंद गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असते.परती च्या प्रवासात टिळक मैदान येवला येथे सर्व शिव शंभु भक्तांच्या वतीने स्वागत करण्यात आले.डॉ.संदिप महिंद गुरुजी म्हणाले कि,पानिपतची शौर्य गाथा घराघरात पोहचवण गरजेचे आहे.यामुळे या मोहिमेत ठिकठिकाणी सभा, बैठका ,चर्चा सत्र चं आयोजन केलं जात.यातुन च पानिपत म्हणजे पराभव हा अर्थ मोडित निघत.पानिपत म्हणजे मराठी शौर्य पराक्रमांची धगधगती शौर्य गाथा,हे जनमाणसांत बिंबवण्याचा प्रयत्न होतो.यावेळी मोहीमीचे स्वागत
अँड शाहूराजे शिंदे ,आनंद शिदे,धिरजसिंह परदेशी, बाळासाहेब देशमूख ,देवरे सर , अविनाश शिंदे, प्रविण निकम ,आदित्य नाईक, गोरख कोटमे, दिपक देशमुख आदीसह अनेक शिवप्रेमी नागरिकांनी केले. येवल्यातील स्वागता नंतर तालुक्यातील आडगांव रेपाळ ,विखरणी ,विसापुर ,गुजरखेडे,कातरणी आदी पंचक्रोशी गावांत मोहीमेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी डॉ.संदिप महिंद गुरुजी, सोबत सुधीर ईगवले,विलास ढोमसे,बापु शेलार,संजय बोळीज,संदिप बरशीले,निबाजी फरताळे, भगवान शिंदे,नारायण गुंजाळ,रामनाथ ढोमसे ,रविंद्र बिडवे,गोरख कोटमे,सुभाष तनपुरे, दत्तु नाईकवाडे,योगेश महाले,अरूण मुरकुटे, संदिप गायके, शिवाजी निकम, बापुसाहेब चव्हाण,जगन गुंजाळ,भाउसाहेब महाले आदी शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या