‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे मार्गदर्शक,ज्येष्ठ नेते,चांदवड(जि.नाशिक)चे माजी आमदार मा.श्री.उत्तमबाबा भालेराव यांचे सुपुत्र,चांदवड पंचायत समितीचे माजी सभापती व ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे वडनेरभैरव गणसमन्वयक श्री.अमोल भालेराव हे नुकत्याच झालेल्या ‘कादवा सहकारी साखर कारखान्या’च्या निवडणुकीत संचालक म्हणून भरघोस मतांनी विजयी झाले.
‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या वतीने श्री.अमोल भालेराव यांचा वडनेरभैरव येथे सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नेते श्री.उत्तमबाबा भालेराव, ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील,सहसमन्वयक श्री.प्रकाशराव महाले,नाशिक विभाग समन्वयक श्री.संजय भांबर,ठाणे जिल्हा (शहर) समन्वयक श्री.उमेश पवार,सरपंच संसदेचे हितचिंतक ज्येष्ठ स्नेही नवी बेजचे उपसरपंच श्री.अशोकदादा पवार व मुखेडचे सरपंच श्री.अमोल जाधव हे यावेळी उपस्थित होते.

