चांदवडला डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,च्या वतीने स्वछता अभियान मोहीम संपन्न
डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने चंदवाड़ शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून खूप मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कार्यालयात स्वच्छता करण्यात आली हे एक सेवाभावी व समाजाभिमुख लोकोपकारी उपक्रम करणारे प्रतिष्ठान असल्याने प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन, जलपुनर्भरण ,आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर इत्यादी तसेच गरजूंना शालेय साहित्य पुरवणे, साक्षरता वर्ग चालवणे, विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन असे उपक्रम प्रतिष्ठान मार्फत राबवले जातात.
दि.१४ मे हा दिवस पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस दिवस असल्याने त्यानिमित्ताने प्रतिष्ठानने दि. १५ मे रोजी स्वच्छता अभियान आयोजित केले होते. या अंतर्गत १५ मे रविवार रोजी चांदवड शहरात पोलिस स्टेशन ,सरकारी रुग्णालय,तहसील कार्यालय, बस स्टॉप,बाजार तळ (सोमवार पेठ) येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियान सकाळी ७ वां झाले व १० वाजेपर्यंत शिस्तबद्ध रीतीने पूर्ण झाले. यात प्रतिष्ठानच्या ८० सदस्यांनी सहभाग नोंदवला दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली कार्यालये , २ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून. साधारणतः १००० क्विंटल हून अधिक कचरा गोळा करण्यात आला व नगरपरिषद चांदवड यांचे कचरा कचरा डेपो येथे टाकण्यात आला मराठी नगरपरिषदेचे मोलाचे सहकार्य लाभले ,चांदवड चे प्रथम नागरीक भूषण कासलीवाल, उपजिल्हा रुग्णालयातील चतुर्थ कर्मचारी व विविध पदावर असलेले मान्यवर यांनी उपस्थित दर्शविली. सर्वांनी प्रतिष्ठानचे हे कार्य अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे असे सांगून प्रतिष्ठान च्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या” तसेच भूषण कासलीवाल यांनी स्वच्छता दूत यांचे गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
परंतु शासकीय यंत्रणेने देखील लक्ष द्यावे
उपजिल्हा रुग्णालय, बाजारतळ(नगरपरिषद), बस स्टॉप, इतर शासकीय कार्यालये येथे स्वच्छ्ता करत असताना येथे 8 ते 10 ट्रॅक्टर कचरा निघालेला असून येथील कर्मचारी अधिकारी हे स्वच्छता करत नाहीत असे निदर्शनास आले शासकीय कार्यालये ही फक्त शासकीय कामकाजासाठी नव्हे तर त्यांनी आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवावा हे देखील कामे आपले असताना यावर नक्कीच दुर्लक्ष झालेले दिसून आले.
तसेच उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून नवीन वृक्षारोपण व सुशोभीकरणाचे काम चालू आहे हे वगळता अन्य एकही शासकीय विभागांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून नवीन वृक्षारोपण झालेले दिसून येत नाही तसेच सुंदर माझे कार्यालय या अनुषंगाने कोणतीही उपाययोजना झालेली दिसून येत नाही.


तसेच उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून नवीन वृक्षारोपण व सुशोभीकरणाचे काम चालू आहे हे वगळता अन्य एकही शासकीय विभागांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून नवीन वृक्षारोपण झालेले दिसून येत नाही तसेच सुंदर माझे कार्यालय या अनुषंगाने कोणतीही उपाययोजना झालेली दिसून येत नाही.