[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता

स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने वडनेर भैरव येथे जिल्हास्तरीय अमृत महोत्सवी वाढदिवस ७५ व्यक्तींचा मातृ पितृ वंदन कार्यक्रमाचे आयोजन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

राज्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी ७५ जेष्ठांचा वाढदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच कार्यक्रम

  • मातृ पितृ वंदन गौरव ग्रंथ प्रकाशित केला जाणार
  • चार हजारलोकांना अन्नदान करण्यात येणार
  • कार्यक्रमाची नोंद विश्वविक्रमासाठी व्हावी म्हणून प्रयत्न केले जाणार
  • नाथउपदेशी सलादे बाबा प्रतिष्ठान नाशिक व वडनेर भैरव परिसर दत्त महाराज सेवा संस्था हे आहे आयोजक

चांदवड (प्रतिनिधी) : – भारताच्या स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने वडनेर भैरव येथे जिल्हास्तरीय अमृत महोत्सवी वाढदिवस ७५ व्यक्तींचा मातृ पितृ वंदन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने श्री. मनोहर नाना पाटोळे व श्री. दत्ता शिंदे यांनी दिली.
आयोजक यांच्या वतीने माहिती देतांना म्हटले आहे की नाथउपदेशी सलादे बाबा प्रतिष्ठान नाशिक व वडनेर भैरव परिसर दत्त महाराज सेवा संस्था यांच्या वतीने वडनेर भैरव येथे ग्रामस्थ व पदाधिकारी यांची बैठक आज दिनांक ४जुन रोजी संपन्न झाली यात यावर्षी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत असून देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. म्हणून नाशिक जिल्हयातील ज्यांचे वय ७० ते १०० पेक्षा अधिक आहे अशा ७५ व्यक्ती यांचा सामुदायिक अमृत महोत्सवी वाढदिवस म्हणजेच मातृ पितृ वंदन कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.मातृ पितृ वंदन कार्यक्रम हा अनोखा असून कदाचित राज्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी ७५. जेष्ठांचा वाढदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच कार्यक्रम असेल. या प्रसंगी मातृ पितृ वंदन गौरव ग्रंथ प्रकाशित केला जाणर आहेचार हजारलोकांना अन्नदान करण्यात येणार आहे अमृत महोत्सवी वाढदिवसासाठी जिल्हयातून ७५ व्यक्तींची निवड केली जाणार आहे. आलेल्या प्रवेश अर्जातून हे ७५ लोक निवडले जाणार आहे. म्हणून नोंदणी साठी संपर्क व अधिक माहिती श्री. दत्तात्रय शिंदे ८६५७७५५७७७ आप्पा मोरे, राहुल पाचोरकर, उत्तम भोसले, सुरेश उशीर यांच्याशी संपर्क साधायचा असे आयोजक संस्था यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मान पत्र देवून येथोचीत गौरव केला जाणार आहे. हा कार्यक्रम ची नोंद विश्वविक्रमासाठी व्हावी म्हणून प्रयत्न केले जाणार आहे.
बैठकीस नाथउपदेशी सलादेबाबा प्रतिष्ठान नाशिक व वडनेर भैरव परिसर दत्त महाराज सेवा संस्था चे पदाधिकारी व ग्रामस्थ दत्तात्रय निखाडे, रामचंद्र आप्पा मोरे, राहुल पाचोरकर, उत्तम भोसले, बापू सिरसाठ, भाऊसाहेब पवार, सुरेश पवार, डॉ. विक्रम सलादे, सुरेश सलादे, राजेंद्र जाधव, दत्ता शिंदे, युनूस मणियार, पठाण फर्जद अजय खिराडकर, निकम सर्जेराव आदी उपस्थित होते.
अमृत महोत्सवी वाढदिवस कार्यक्रम चे स्थळ व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल असे श्री. मनोहर नाना पाटोळे, दत्ता शिंदे कळविले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या