[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

बातम्या सांगणारा श्रवणीय आवाज हरपला – छगन भुजबळ

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

सह्याद्री वाहिनीचे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांना मंत्री छगन भुजबळ यांची श्रध्दांजली

मुंबई, दि. ७ जून

सह्याद्री वाहिनीचे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने वृतवाहिण्यांवर बातम्या सांगणारा श्रवणीय आवाज हरपल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ म्हणतात की, सह्याद्री वृत्तवाहिनीवर अतिशय शांततेत पण भारदस्त आवाजात नमस्कार, आजच्या ठळक बातम्या अशी सुरवात करून प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती प्रदीप भिडे हे देत होते. त्यांच्या आवाजावरूनच अनेक लोक त्यांना ओळखत होते. ज्या काळी टिव्हीवर बातम्या देणारी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती त्याकाळी आपल्या खास आणि वेगळ्या शैलीने प्रदीप भिडे यांनी आपली ओळख तयार केली होती.

चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रदीप भिडे यांच्या निधनाचे वृत्त एकूण धक्का बसला. त्यांच्या निधनाने भिडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटंबीय भिडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अश्या भावना मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात मांडल्या आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या