[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड चौफुलीवर एक भिषण अपघात महिला जागेवर ठार

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड चौफुलीवर एक भिषण अपघात महिला जागेवर ठार

चांदवड चौफुलीवर पेट्रोल पंपसमोर एक भिषण अपघात झाला असून महिला जागेवर ठार झाली आहे.यावेळी आपल्या पती सोबत व एक नात स्वरा दीपक जाधव वय (3) वर्ष, स्वतः अभिमान किसन जाधव (65) पत्नी यमुनाबाई अभिमान जाधव (64) असे तिघे राहणार कानमंडळे तालुका चांदवड हे कामानिमित्त कांनमंडाळे येथून चांदवड येथे कार्यक्रम निमित्त जात असताना बजाज कंपनीची प्लॅटिना एम.एच.15 जी.जे.7085 या वाहनावर असताना एक ट्रक ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

यात अभिमान जाधव यांना पायाला जबर मार लागलेला असून लहान मुलगी ही किरकोळ जखमी आहे. सदर घटनेची अधिक चौकशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर,पोलीस देशमुख ,सानप आदी चौकशी करत आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या