माजी पंचायत समिती सदस्या श्रीमती ठोंबरे यांचे दु:खद निधन
ईगतपुरी – नवनाथ गायकर : ईगतपुरी पंचायत समितीच्या माजी सदस्या तथा वाळविहिर, ता.ईगतपुरी येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीमती चांगुणाबाई ठोंबरे यांचे नुकतेच व्रुद्धपकाळाने निधन झाले आहे. म्रुत्यु समयी त्यांचे वय ७९ वर्षे होते.
अतिमागास गणल्या जाणाऱ्या ठाकूर समाजात जन्माला येऊनही केवळ शिक्षणाच्या आधारावर त्यांनी आपल्या कुटुंबाला सुशिक्षित, सुसंस्कृत व प्रतिष्ठित बनवले होते.
त्यांच्या घरातच प्रथम पासुन राजकीय व शैक्षणिक वारसा होता.पती कै.रामचंद्र ठोंबरे हे गावचे सरपंच होते तर मुलगा अशोक ठोंबरे हे ही तब्बल पंधरा वर्षे गावचे सरपंच होते.
त्यांचा दुसरा मुलगा राजेंद्र ठोंबरे हे शिक्षक तर सुनबाई या न्यायालयात नौकरी करत आहेत. तसेच दोन नातुही शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचा दशक्रिया विधी वाळविहिर येथे शनिवार दि. ११ जुन रोजी सकाळी १० वा.आहे. या निमित्ताने माजी आमदार तथा ह.भ.प.पांडुरंग बाबा गांगड यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.

