चांदवड : चांदवड येथील लिंगायत फाउंडेशन, नासिक लिंगायत संघर्ष समिती, नाशिक चांदवड मर्चंट को-ऑप बँक लि.चांदवड,लिंगायत जंगम व गोसावी समाज चांदवड यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.यामध्ये मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिक यांच्यातर्फे मॅमोग्राफी, ओरल स्क्रीनिंग, पॅप स्मिअर,संपूर्ण रक्ताची तपासणी,सिरम क्रिएटिनि, साखरेची तपासणी, तसेच अशुअर्ड केअर प्लस हॉस्पिटल नाशिक, यांच्याकडून डॉक्टरांचा सल्ला, रक्तातील साखर तपासणी, ई. सी.जी. तपासणी, हॉस्पिटलमध्ये विविध तपासण्या यांवर सूट तसेच विविध आजारांवर डॉक्टरांच्या तपासणी वर सूट असे शिबिरामध्ये घेण्यात आले.यावेळी सदर कार्यक्रम प्रशासन व आयुक्त मालेगाव महानगरपालिका चे भालचंद्र गोसावी तसेच सदस्य महाराष्ट्र राज्य सहकार समिती व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे ओम प्रकाश काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राहुल आहेर, प्रदीप साखरे, प्रथम नगराध्यक्ष भुषण कासलीवाल, जि.प.स.डॉ.आत्माराम कुंभार्डे, अनिल चौगुले, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी, चंद्रशेखर दंदगे संदीप झापेकर, आनंदजी दांदगे, आदी पदाधिकारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी 104 इतक्या रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली व त्यावर उपचार घेतले. सदर कार्यक्रमासाठी महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड यांचे व शिक्षवृंद यांचे सहकार्य लाभले.या वेळी अशोक व्यवहारे,नदुकाका कासलीवाल,सुनील कबाडे,डॉ.प्रकाश कबाडे,बाळासाहेब होनराव, परवेजखान पठाण, जाकिर शहा,संजय देशमुख, शाम देशमुख, भगवान कबाडे,राजेंद्र कबाडे, हेमंत गुरव,हे व आदी नागरीक उपस्थित होते.

