चांदवड कृषि विभागामार्फत निराधार कुटुंबांना मोफत बियाणे वाटप
तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत कृषी उद्योग भांडार यांच्या मदतीने कोरोना आजाराने मयत कुटुंबाना मोफत मका बियाणे वाटप करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत व सुफलम सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जळगाव या कंपनीच्या मदतीने कोरोना या आजाराने मयत झालेल्या कुटुंबातील सदस्यांना मका बियाण्याचे उपविभागीय कृषि अधिकारी संजय सूर्यवंशी,तहसीलदार प्रदीप पाटील,गटविकास अधिकारी महेश पाटील,सहाय्यक गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबातील सदस्यांची होणारी अवस्था व आर्थिक स्थिती याची जाणीव ठेवून समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी पुढाकार घेऊन कृषी उद्योग भांडार चांदवड यांच्या मदतीने सुफलम सीड्स या कंपनीमार्फत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सुफलम सीड्स चे जिल्हा प्रतिनिधी हेमंत देवरे व कृषी उद्योग भांडार चे संचालक अजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.तसेच सदर उपक्रम हा अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून तालुक्यातील इतरही कृषी सेवा केंद्रांनी सदर बाधित कुटुंबांना बियाणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे.सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अनिल मोकळ,अमित भोसले,मनीषा जाधव,कृषी पर्यवेक्षक प्रकाश सायाळेकर, रोमा आहेर,अर्चना देशमुख, सुरेखा पाटील, संगीता बोंडे, अश्विनी जवरे, सुनिता शेवाळे, चंद्रकला पगार, ललिता कापडणीस आदि कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

