सर्व्हर डाउनमुळे अडली शेतकऱ्यांची कामे
सध्या खरीप हंगामाचे पीक कर्जासाठी शेतकरी बोजा चढवणे व इतर फेरफार नोंदीसाठी तलाठी ऑफिसला चकरा मारत आहे, वारंवार सर्वर डाऊन झाले, साईट चालत नाही असे उत्तर शेतकऱ्यांना मिळत आहे .त्यामुळे बळीराजाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .तसेच सातबारा वरील इतर फेरफार नोंदी, वारस नोंदी, खरेदी विक्रीच्या नोंदी ,इत्यादी कामे महसूल विभागाशी निगडित आहेत मात्र संपूर्ण जिल्ह्यातच सर्वर सतत डाऊन होत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते कधी चालू होईल व कधी बंद पडेल याचा कोणताही थांबपत्ता लागत नाही .वारंवार सर्वर डाऊन होत असल्याने वेळेवर काम होत नाही , सध्या शेतीचे कामांची गर्दी असल्याने शेतकऱ्यांना शेतीचा खरीप हंगाम सोडून नाईलाजोस्ताव तलाठी कार्यालयात दिवसभर बसून राहावे लागते ,पीक कर्जाचा बोजा वेळेवर चढवला गेला नसल्याने पीक कर्ज बँकांकडून मिळत नाही .त्यामुळे शेतीच्या हंगामासाठी कर्ज मिळवायचे कसे ,असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तरी संबंधित यंत्रणेने सर्वरच्या अडचणी त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे .
ई – पिक पाहणी संदर्भात अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञान नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे पिके लागलेले नाहीत व सध्या कर्जासाठी सातबारा उताऱ्यावर या वर्षाचे पीककर्ज यासाठी पिक पेरा लागणे आवश्यक आहे. मात्र पीक पाहणी बंद असल्याने शेतकऱ्यांना पीक पाहणी लावता येत नाही. त्यामुळे कर्ज मिळवायचे कसे अशी मोठी गंभीर समस्या शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे.

