मालेगाव जिल्हा निर्मितीला विरोध नाही परंतु जनभावना लक्षात घेऊन चांदवड व देवळा तालुका नाशिक जिल्ह्यातच राहावा – आ.डॉ.राहुल आहेर
आज दि. ३० जुलै २०२२ रोजी मालेगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नाशिक विभागीय आढावा बैठकीत आपल्या भाषणात चांदवड – देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी मालेगाव जिल्हानिर्मितीला आमचा विरोध नाही परंतु चांदवड व देवळा तालुक्यातील जनेतीची भावना आहे की चांदवड व देवळा तालुका हा नाशिक जिल्ह्यातच राहावा परंतु प्रशासनाने आराखडा बनवत असतांना कुठल्याही लोकप्रतिनींधीसोबत आजपर्यंत लेखी अथवा तोंडी चर्चा केलेली नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तरीही जनतेच्या भावना लक्षात घेवून चांदवड व देवळा तालुका हा नाशिक जिल्हयामध्येच राहावा अशी सर्वांची मागणी आहे असा मुद्दा उपस्थित केला.
तर आ.डॉ.राहुल आहेर यांनी उपस्थितीत केलेल्या मुद्दावर बोलतांना मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले की जनभावना लक्षात घेऊनच जिल्हा निर्मितीचा आराखडा होईल तसेच सर्वांना विश्वासात घेतल्या शिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही.

