जिल्हा परीषद प्राथमिक शाळा,दरेगाव येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा,दरेगाव येथील शालेय व्यवस्थापन समिती कार्यकालाची वाढीव मुदतही संपली असल्याने सन-२०२२ते२०२४ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड करून समिती नव्याने गठीत करण्यात आली आहे.
यासाठी पालकांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. दरेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीचे या सभेत गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी सौ .नूतन किरण पगार व उपाध्यक्षपदी मनीषा दत्तू गांगुर्डे यांची निवड करण्यात आली . समितीच्या सदस्य पदी विक्रम कारभारी देवरे, सुखदेव बाळू पगार ,बाबाजी नागु पगार ,बाबाजी श्रावण देवरे, सौ. सौ.ठकुबाई एकनाथ पगार ,सौ सुनीता संतोष पिंपळे, सुभाष मच्छिंद्र पिंपळे ,सो अश्विनी शंकर मगर यांची पालक प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी निवड करण्यात आली . शिक्षक प्रतिनिधी सरला अहिर ,विद्यार्थी प्रतिनिधी करूना मनीष अहिरे व सत्यम संजय अहिरे व सचिवपदी शाळेचे मुख्याध्यापक हे पदसिद्ध सचिव म्हणून निवड करण्यात आली
यावेळी नूतन अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस विविध वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक जनार्दन देवरे यांनी केले . यावेळेस मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी मार्गदर्शन केले .यावेळेस सर्व शिक्षक उपस्थित होते. .

