[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

व्ही. के. डी. स्कूल & ज्युनिअर काॅलेजमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

व्ही. के. डी. स्कूल & ज्युनिअर काॅलेजमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

भावडे ता.- देवळा येथील एस. के. डी. चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक संचलित व्ही. के. डी. इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर काॅलेज मध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.
प्राचार्य श्री. नितीन वाघ, पर्यवेक्षक श्री. संजय ठाकरे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन भाषणे सादर केली. सारिका चव्हाण, वल्लवी शिंदे, तुषार निलख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शिक्षक नरेंद्र साबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे गीत सादर केले. अतुल कासव यांनी सूत्रसंचालन केले तर किशोर धोंडगे यांनी आभार मानले. संस्थेचे चेअरमन संजय कारभारी देवरे व सेक्रेटरी मीना देवरे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.रत्नमाला सोनवणे व विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी यांनी परिश्रम घेतले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या