कोरोमंडल इंटरनॅशनल ली. मार्फत जोपूळ ता चांदवड येथे शेतकऱ्यांना सोयाबीन , मका व इतर पिकाचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वेळी कोरोमंडल कंपनीचे झोनल व्यवस्थापक श्री समाधान बुधवंत यांनी पिक नियोजन व हंगामातील खत व्यवस्थापक याविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबत नव्या टेक्नोलॉजीचा वापर करावा व शेतीला आधुनिक रूप द्यावे असे प्रतिपादन मार्केटिंग अधिकारी श्री उदय चौधरी यांनी केले.
पिकाला गरजेपुरते व सल्फरयुक्त मिश्रखते देऊन मातीची ताकद वाढवावी. यासाठी बाजारात निरनिराळ्या कंपनीच्या कृषी निविष्ठा उपलब्ध आहेत. सेंद्रिय सोबत रासायनिक खतांची योग्य सांगड घातल्यास उत्पन्न वाढेल असे प्रतिपादन मे. जाधव आणि कंपनीचे संचालक व तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री संजय जाधव यांनी केले. कोरोमंडलचे वितरण व्यवस्थापक किरण ठाकरे यांनी माती परीक्षण, पाणी परीक्षण, पान-देठ परीक्षण तसेच ग्रोमोर, ग्रोस्मार्ट, ग्रोप्लस, ग्रो शक्ती या खतांविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी कैलास सावकार, पप्पू कोतवाल, दीपक वाघ, दत्तू कोतवाल, साहेबराव जाधव, केदू सावकार, वामन धामणे, पांडू जाधव, अरुण जाधव, नंदू वाघ, दगू कोंडाजी जाधव, दिगंबर कोतवाल, अण्णा कोतवाल, गौरव जाधव, अमोल धामणे, धोंडीराम जाधव, दत्तू जाधव, वाळू जाधव, राम पिंपरकर, बाबाजी जाधव, परशराम केदारे, राहुल केदारे आदी शेतकरी उपस्थित होते. या प्रसंगी जय योगेश्वर बहुद्देशीय सेवा संस्थेचे पंडित जाधव व समर्थ ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

