दरेगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात
चांदवड प्रतिनिधी.- दरेगांव ता.जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जेष्ठ नागरिक चंद्रकांत देवरे व पुजन शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते तर विकास माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण वामन गांगुर्डे व पुजन वाल्मीक देवरे यांनी केले.तर येथे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच अमोल देवरे व पुजन म्हसु पगार, विविध कार्यकारी सेवा सह.सोसायटीचे ध्वजारोहण माजी सैनिक समाधान गांगुर्डे व पूजन उत्तम गांगुर्डे, , वैद्यकीय दवाखान्याचे ध्वजारोहण डॉ. आशा राजपुत व पुजन सदस्य भिला पगार यानी केले. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा व विकास माध्यमिक विद्यालयाने गावातुन प्रभात फेरी काढुन ग्रामपंचायत,विविध कार्यकारी सोसायटी व शाळेत राष्ट्रगित व ध्वजगीत सादर केले. जिल्हा परीषद शाळेत गृहरक्षक दलातील निवृत्ती आहिरे यांना विद्यार्थ्यांना सैन्य दलाचे प्रशिक्षण दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. रांगोळी स्पर्धा,गायन स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र शालेय समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ यांच्या हस्ते देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटी यांचे पदाधिकारी व व,सदस्य,वैद्यकीय अधिकारी,आशा सेविका,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन देवरे व शिक्षक वृंद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण गीते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

