[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

ओबीसी समाजाच्या मोर्चाची धडक

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका समता परिषद चांदवड तालुका व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती चांदवड तालुका यांच्या नेतृत्वाखाली आज चांदवड तहसील कार्यालय वर धडक मोर्चा काढण्यात आला ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आदि मागण्यांसाठी हा मौर्चा काढण्यात आला.

आरक्षण अबाधित राहण्यासाठी चांदवड तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्या मोर्चाची धडक

चांदवड ( प्रतिनिधी ) : – आरक्षण अबाधित राखण्यासाठी ओबीसी समाजाच्यावतीने राज्याच्या अनेक भागांत मोर्चे काढले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन ओबीसी समाजाने समता परिषदेच्या व चांदवड तालुका ओबिसी आरक्षण बचाव कृती समितीच्या
वतीने चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदना मार्फत ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये वकील नेमावा. त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे. अशी मागणी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. हे निवेदन ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

चांदवड तालुका समता परिषद चांदवड तालुका व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती चांदवड तालुका यांच्या नेतृत्वाखाली आज चांदवड तहसील कार्यालय वर धडक मोर्चा काढण्यात आला ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आदि मागण्यांसाठी हा मौर्चा काढण्यात आला.

        वेळी नाशिक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड,समता परिषदेचे चांदवड तालुका अध्यक्ष यु. के. आहेर , चांदवड नगर परिषदचे उपनगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा आहेर, डॉ ऎ. पी. निकम, जिल्हा चिटणीस सतिष सोनवणे, बाळासाहेब माळी, आण्णा खैरे, नगरसेवक आल्ताफ तांबोळी,, संदिप उगले, चांदवड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भाऊसाहेब शेलार, अशोक काका व्यवहारे, दिपक शिरसाठ, नगरसेवक रवींद्र अहिरे, ,, संत सावता माळी युवक संघ चांदवड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पगार, संपर्कप्रमुख मंतीन घासी, शांताराम गांगुर्डे, देवीदास शेलार,प्रकाश शेळके, रिजवान घासी.किशोर शेलार, किरण आहेर, सुभाष शेलार, निवृती व्यवहारे,प्रविण साळवे, संजय भडांगे, कैलास खैरे,पोपट बनकर ज्ञानेश्वर पगार ,सागर शेलार, संदिप शेलार,आदि समता सैनिक व ओबीसी समाज उपस्थित होता.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या