[masterslider id="2"]
राज्य राष्ट्रीय संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी चांदवड तालुक्यातून प्रहारचे कार्यकर्ते मोटरसायकलवर दिल्लीकडे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी चांदवड तालुक्यातून प्रहारचे कार्यकर्ते मोटरसायकलवर दिल्लीकडे

चांदवड( प्रतिनिधी) : – केंद्र सरकारच्या कॉपरेट व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळण घेत आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना रोखण्यासाठी सुरू असलेल्या दिल्ली येथील अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चांदवड तालुक्यातून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते ना. बच्चू कडू यांच्या समवेत दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले दहा दिवस दिल्लीच्या सीमांवर आणि कडाक्याच्या थंडीत अहिंसात्मक मार्गाने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे सदर आंदोलनास पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातून प्रहारचे नामदार बच्चू कडू यांच्यासमवेत मोझरी (जिल्हा अमरावती) येथून मोटर सायकल ने प्रवास सुरू करून सध्या ते भोपाळ च्या पुढे निघाले आहेत ,वडनेर, साळसाने, देवरगाव ,भोयेगाव, दिघवद तथा तालुकाभरातून कार्यकर्ते रवाना झाले आहेत,.

मोटर सायकल प्रवासात सामील झालेले चांदवड तालुक्यातील प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नाबाबत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला शेतकऱ्यांना कांद्याचे योग्य दाम मिळणे आवश्यक असताना शासनाने परदेशातून कांदा आयात केला त्यामुळे देशांतर्गत भाव कोसळले परिणामी शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. आम्ही कार्यकर्ते शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे जात आहोत आमच्याबरोबर अपंग बांधवही सहभागी झालेले आहेत

गणेश निंबाळकर यांच्या समवेत गणेश तिडके ,रेवन गांगुर्डे चंद्रभान गांगुर्डे राम बोरसे प्रकाश चव्हाण सँद्दीप जाधव कैलास पगार विजय शिंदे मधुकर पुरकर आदी कार्यकर्ते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे गेले आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या