सावता माळींच्या अभंगातील अध्यात्मिक कृषि दर्शन
महाराष्ट्र भुमी ही संत परंपरेचा वारसा जपलेली भुमी आहे संतांच्या अमृततुल्य रसाळ अभंगवाणीचा आजही मोठ्या भावश्रध्देने गजर चालु आहे याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेऊन अभंगाच्या जोरावर अजरामर झालेले संत सावता माळी सोलापूर जिल्ह्यातील अरुण भेंडी या गावात माळी समाजात त्यांचा जन्म झाला इ.स पुर्व ( १२५०-१२९५) हा आयुष्यातील पंचेचाळीस वर्षांचा अल्पावधी कार्यकाल मानला आहे बाराव्या शतकात त्यांनी रचलेली अभंगवाणी ही मराठी साहित्यातील विशेष स्थान बनली आहे साहित्यामध्ये त्यांची संतकवी म्हणुन ओळख आहे त्याही काळात सावता माळी हे स्वता सुजाण शेतकरी म्हणून प्रसिद्ध झालेले असल्याने त्यांची अभंग रचना शेती ,मातीत फुलं उमलवुन संतप्रभावळीमध्ये प्रसिद्धीस पावलेली आहे मराठीतील नवं रसा पैकी करूण,भक्ती, वत्सल,शांत,दास्य यांनी त्यांची अभंगरचना रससिध्द आहे शीवाय संत साहित्याच्या प्रभावामध्ये अंगीभुत प्रतिभेचा आविष्कार करणारे अभंगाला स्वतंत्र स्थान आहे ती इतर संतांच्या अभंगाहून वेगळी असुन कोणत्याही संतांच्या अभंगाच्या सावलीचा स्पर्श झालेला दिसत नाही सावतांचे अभंग म्हणजे शेतकरी,कष्टकरी, वर्ग यांच्या जीवनावरील वेगळं स्थान साकारत अध्यात्मिक तत्वज्ञान स्पष्ट करून प्रत्येक्षात परमेश्वर विठ्ठलाला कार्यसिद्धी साठी साकडं मांडुन , मानवी जीवनात परोपकारी वृत्तीने मर्म शोधणारी आहे.
आमुची माळीयाची जात शेत लावु बागाईत !!१!! आंम्हा हाती मोट नाडा पाणी जाते फुलझाडा !!२!! शांती शेवंती फुलती प्रेम जाई जुई व्याली !!३!! सावताने केला मळा विठ्ठल देखियला डोळा !!४!!
ही साक्षात परमेश्वर विठ्ठलाला शेतकामात साकडं घालुन प्रांजळ निवेदन करणारी प्रतिभासंपन्न अभंग रचना शेतमळ्यात ,कष्टाने फुलं उमलवुन साक्षात्कारी पांडुरंगाला प्रयत्न करून धार्मिक अध्यातमा बरोबर कृषि जीवनाशी नाते जोडणारी आहे . प्राचिन संत परंपरेचा वारसा आजही मोठ्या अभिमानाने जपलेला महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय अभंगातील वेगवेगळे सूर गाऊन वर्तमान जगण्यात अध्यात्मिक भावसंदर्भ मांडणारा आहे
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसुन मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरि सावताने म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा
ही अभंगातील सभ्यपणा आणि भाववाचक शब्दरचना अगदी शुद्ध अंतःकरण, निर्मळ निरंकारी जीवनाला विठ्ठलभक्ती मध्यें रममाण करणारी आहे .प्रपंचात राहून शेती व्यवसाय करून सुध्दा नामस्मरणाने ईश्वर भक्ती करता येते हा अधिकार सर्वांना आहे वारकरी संत परंपरेपासून संत सावता माळींचा अभंग वारी बरोबर, मंदिरे, किर्तन, प्रवचने,अखंड हरिनाम सप्ताहात मोठ्या हर्षाने गायनामध्ये कलावती रागाची सांगड घालून आळवणी केली जाते
सुभाष नारायण कामडी
मु वांगण सुळे पो पळसण ता सुरगाणा
मोबाईल नं ९५७९५४३३०८

