[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दोन्ही बाजूने संवाद हाच राष्ट्रवादीचा परिवार संवाद ना. जयवंतराव पाटील यांचे चांदवडला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

चांदवड-देवळा तालुक्याच्या पाणीप्रश्नी लवकरच मुंबईला विशेष बैठक घेणार

चांदवड/ विक्रम देवरे
चांदवड ( प्रतिनिधी ): -चांदवड येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेप्रसंगी संवाद साधताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंधारण मंत्री जयवंतराव पाटील यांनी सांगितले की, पक्षाची बुथ सांभाळ करणारी यंत्रणा एकच पाहिजे.अभिप्राय नोंदणी मध्ये नाशिक जिल्हातुन ५९२६३अभिप्राय आले आहेत. त्यातही युवक राष्ट्रवादी काँग्रेसने उत्साहाने अभिप्राय दिले. तालुक्यातील उत्तमबाबा भालेराव व डॉ. सयाजीराव गायकवाड हे एकत्रितपणे चांगले काम करतात.कार्यकर्ते्यांनी व्यवस्थित पणे काम केले तर २०२४ मध्ये आम्ही हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा प्रयत्न करु. जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार यांच्या माध्यमातून प्रमुख लोक एकत्र येऊन एक दिवस विशेष चांदवड व देवळा तालुक्यातील पाण्याची समस्येवर काय करता येऊ शकते,यासाठी मुंबईला अधिकार्यां समवेत मिटिंग घेऊन मदत करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.आपला पक्ष मोठा झाला तर आपण मोठे होतो. पैसा मोठा नाही, राजकारणात वेळेची गुंतवणूक करायची असते. पक्षाच्या स्थापनेपासून आपल्या पक्षात आहे, त्यांनी आपले आयुष्य आपल्या पक्षात गुंतवलेले आहे. पक्षाचे भवितव्य उज्ज्वल करण्याशिवाय पर्याय नाही.भविष्यकाळात पक्ष मोठा झाला पाहिजे, जे काम आपण करताहेत ते वेगाने केले पाहिजे. हा राष्ट्रवादी परिवार संवाद आहे.दोन्ही बाजूने संवाद व्हावा लागतो. मी यायचे भाषण करायचे, निघून जायचे. असे न करता तुमचे काय आहे ते ऐकून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे फार मोठे मोहळ आहे. कार्यकर्त्यांचे शरद पवार साहेब व राष्ट्रवादीवर प्रचंड प्रेम आहे. तुम्हीही माझ्यासाठी थांबला नसून शरद पवारांसाठी थांबले आहात. महाराष्टात सर्वात स्टॉंग व उत्तुंग नेता आपल्या पक्षाकडे आहे. आपला शत्रु कोण आहे हे निश्चित केले पाहिजे. काँग्रेसची साथ घेतली पाहिजे. जोरदार बँटिंग केली तर हा मतदारसंघ आपण मिळूवू शकतो. असेही ना. जयवंतराव पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी यावेळी सांगितले की, परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून पांढऱ्या कागदावर शाहिने लिहलेली कार्यकारणी खरच अस्तित्वात आहे का याची पडताळणी आम्ही करत असतो.विरोधकांशी संघर्ष करून कार्यकर्ते पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहचवतात. सत्तेच्या बाहेर गेल्यावर संघटनेचे महत्त्व कळते. सत्ता गेली तेव्हा साहेबांना साथ देण्यासाठी संघटना व कार्यकर्ते उरली. अशा कार्यकर्त्यांना सत्तेच्या काळात मानसन्मान मिळावा म्हणून परिवार संवाद यात्रेतुन लक्ष दिले जात आहे.राष्ट्रवादीमय महाराष्ट्र ही संकल्पना या परिवार संवाद यात्रेची आहे.तत्पूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी चांदवड व देवळा तालुक्यातील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस,महिला काँग्रेस, ओ.बि.सी सेल, साहित्य व सांस्कृतिक विभाग, सोशल मीडिया विभाग, डॉक्टर सेल,राष्ट्रवादी किसान सभा, सार्वजनिक ग्रंथालय सेल,अल्पसंख्यांक सेल, युवती काँग्रेस,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सामाजिक न्याय विभाग, कायदा सेल, सेवादल यासारख्या विविध फ्रंटल विभागाचा आढावा घेतला. ना. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले की,गडचिरोली पासून सुरू झालेली परिवार संवाद यात्रा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पार पडली आहे. अनेक ठिकाणी जाऊन आढावा घेतला आहे. काम करणारा कार्यकर्ता नेता होत असतो, फोटो व बँनरवर फोटो लावून नेता होत नाही.यावेळी चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड यांनी चांदवड तालुक्यातील पक्षाच्या बुथ कमिट्या,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, कादवा कारखान्यात चार संचालक राष्ट्रवादीचे असुन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा, अशी मागणीही त्यांनी केली.देवळ्याचे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत शिरसाठ ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील आहेर,देवळा शहराध्यक्ष दिलिप आहेर, योगेशआबा आहेर यांनी माहिती दिली.  चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे यांनी यावेळी संघटनेबाबत माहिती देतात सांगितले की, युवक काँग्रेसने विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. चाळीस अंगणवाडी सेविकांना वाफेचे यंत्र कोरोनाकाळात युवक काँग्रेसने मोफत वाटप केले.विविध आंदोलने केली. युवा संवाद दौऱ्यानिमित्ताने चांदवडला संवाद दौरा आयोजित केला होता. तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. तसेच तालुक्यातील विविध सरपंचांची मुलभूत सुविधा व इतर कामे मार्गी लागली पाहिजे अशी मागणी दत्तात्रय वाघचौरे यांनी केली. सुत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजयजी जाधव यांनी केले.यावेळी सुखदेव ठाकरे यांनी पाण्याचा संदर्भात तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयनाना गांगुर्डे यांनी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली. तुकाराम सोनवणे, वाहेगावसाळचे सरपंच केशव खैरे देवळ्याच्या उषाताई बच्छाव,प्रा.सुरेश गुंजाळ, तळेगावरोहीच्या सरपंच तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधनाताई पाटील, प्रकाश शेळके, खडकओझरचे वसंत पगार,सेवादलाचे दशरथ ठाकरे, विद्यार्थी काँग्रेसचे अभिजित ठाकरे ,सामाजिक न्याय विभागाचे गजानन पगारे ,कायदा विभागाचे अँड. नवनाथ आहेर,अभिजित कोतवाल आदींनी ना. जयवंतराव पाटील यांच्या समोर समस्या मांडल्या .

यावेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ, राष्ट्रवादी यूवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार,कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, ,यूवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पवार ,प्रेरणाताई बलकवडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, समता परिषदेचे दिलिपअण्णा खैरे,देवळा जि.प.सदस्य यशवंतराव शिरसाठ, जि.प.सदस्या नुतन आहेर, चांदवड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दत्तात्रय वाघचौरे, देवळा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील( गोटूआबा) आहेर, योगेश अहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी विजयजी जाधव, सुनिलतात्या कबाडे, जिल्हा सरचिटणीस रघुनाथअण्णा आहेर,समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सतिष सोनवणे,समता परिषदेचे चांदवड तालुकाध्यक्ष यु.के.आहेर,पंचायत समितीचे माजी सभापती अमोल भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अरूण न्याहारकर, माजी उपसभापती अनिल काळे,शहाजी भोकनळ, म्हसु गागरे ,राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष साधनाताई पाटील, भारतीताई देशमुख, प्रा.सूरेश गुंजाळ, कादवा संचालक सुखदेव जाधव, वडनेरभैरवचे माजी उपसरपंच रावसाहेब भालेराव, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी अनिल पाटील, वाहेगावसाळचे माजी उपसरपंच ईंजी.महेश न्याहरकर ,युवक काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी शैलेश ठाकरे, विक्रम जगताप, विजयनाना गांगुर्डे, दुगावच्या सरपंच आरतीताई सोनवणे, युवकचे ज्ञानेश्वर पगार, किरण आहेर,बाकेराव जाधव,रिजवान घाशी, बाळासाहेब मावळे, डोणगावचे सरपंच जगदीश शेळके, रौनक कबाडे, मतिन घासी,सुनील ठाकरे, राजेंद्र ठोंबरे, अशोक खैरे,अमोल खैरे, अशोक शिंदे, निवूत्ती शेळके,उत्तम कोल्हे,रावसाहेब देवरे, दत्तु पगार, देवमन पवार, दशरथ ठाकरे,चेतन सोनवणे, गोरख शिंदे, माधव पवार, केशव खैरे, धनंजय ठाकरे, जगनदादा खेमणार, संजय अहिरे,भाऊसाहेब गांगुर्डे,नाना गोडबोले, धनंजय निलसकर आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात
दत्तात्रय शंकरराव वाघचौरे ,विजय वसंतराव गांगुर्डे, हरि भाऊसाहेब निकम, जगदिश यशवंत शेळके, संदिप साहेबराव शिंदे ,गौरव विनायक भवर, परसराम दत्तु निकम ,दिपक मच्छिंद्र शिंदे ,सचिन नारायण ठाकरे ,बापू लालजी गाजरे, जयराम मोतीराम आवारे, दर्शन दौलतराव घुले, किरण हिरामण गरूड ,धनंजय शंकरराव पुरकर, सागर विलास महाले, डॉ . विक्रम अशोकराव सलादे ,शिवनाथ सुकदेव खुटे ,रमेश बाळु वाकचौरे, तुषार बाळकृष्ण बोरसे, तुषार सखाराम पवार, सागर मोतीराम गांगुर्डे, ज्ञानेश्वर कचरू पगार ,नितीन दिलीपसिंग परदेशी, बापु नंदकिशोर शिरसाठ, रमेश बाबाजी शिंदे, समाधान आनंदा ठाकरे ,अण्णा मारूती गांगुर्डे, सागर सोमनाथ साठे ,सोपान कोंडाजी पुरकर, रावसाहेब कारभारी देवरे, चेतन शामराव देशमाने, हितेंद्र मधुकर बोरसे ,दत्तु भास्कर पगार, हरिश कारभारी गुंजाळ ,अमित सुभाष शिंदे ,शरद बाबुराव पुरकर, समाधान दसरथ वाड, किरण भाऊसाहेब शिरसाठ ,वैभव निवृत्ती गांगुर्डे, भुषण शेळके, गोकुळ अशोक जाधव ,विवेक रमण खुटे ,चांगदेव छबु खांगळ, नवनाथ अनिल सोनवणे ,नवनाथ खंडेराव आहेर, सुरेश भाऊसाहेब गांगुर्डे ,केशव काशिनाथ खैरे, तुषार सखाराम पवार, चेतन काशिनाथ जाधव ,बाजीराव नाना जाधव ,दिपक शिवाजी शिंदे, अमृत सुकदेव मढे, बाळासाहेब भिकाजी डुकरे ,अमोल खैरे, रूपम सुनिल कोतवाल ,रौनक महेश कबाडे, अमोल नंदु शेलार, गोविंद दत्तु जाधव ,सागर रामनाथ आहेर ,खंडेराव नामदेव तिडके, पुंडलीक लक्ष्मण कोल्हे आदी उपस्थित होते.

बघा काय म्हणाले नामदार पाटील

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या