[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने दिले जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना तालुक्यातील समस्यांप्रश्नी व राजकीय स्थीतीप्रश्नी  निवेदन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने दिले जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना तालुक्यातील समस्यांप्रश्नी व राजकीय स्थीतीप्रश्नी   निवेदन

 

चांदवड (प्रतिनिधी )जयंत पाटील सो , प्रदेश अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश तथा मंत्री , जलसंपदा , महाराष्ट्र राज्य यांना चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाचा आशय असा.

चांदवड मतदार ( चांदवड , व देवळा ) संघातील खालील विषयाबाबत आपले स्तरावर कार्यवाही करणे बाबत .. आदरणीय महोदय , चांदवड मतदार संघ हा चांदवड व देवळा या दोन तालुक्याचा असुन दोनही तालुके हे दुष्काळी आहे . त्यासाठी खालील विषयाबाबात आपले स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी हि विनंती . १ ) चांदवड मतदार तालुक्यात परसुल सह परिसरात जी अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला असुन झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करुन शासनाकडून शेतकऱ्यांना भरपाई तातडीने मिळावी . २ ) पाणी प्रश्न : चांदवड मतदार संघातील पाणी प्रश्न हा महत्वाचा असुन त्यावर सविस्तर चर्चा करुन पाणी प्रश्न सोडविण्याबाबत पुणेगांव , काळडोह , पुणेगांव उच्चस्तर कालवा , राजदेरवाडी.ल.पा . , रामेश्वर ते झाडी कालवा आदीसह महत्वाच्या प्रकल्पाबाबत मा.कार्यकारी संचालकांसह , मुख्य अभियंता जलसंपदा विभाग , यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची बैठक आपल्या स्तरावर आयोजन करुन त्यात प्रमुख पदाधिकारी यांना बैठकीतसाठी बोलविणे . ३ ) चांदवड मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे कायम ठेवणे ^ : चांदवड व देवळा तालुका मिळून चांदवड मतदार संघ असुन दोन तालुक्यातील पंचायत समित्या मधील देवळा तालुक्याचे सभापती व चांदवड पंचायत समितीचे उपसभापती हे राष्ट्रवादीचे आहेत . तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हे चांदवड तालुक्यातील आहे . तसेच एकुन ७ जि.प.सदस्यापैकी ३ जि.प. सदस्य व २ सहयोगी काँगेसचे सदस्य आहेत .

(कादवा  सहकारी साखर कारखाना , मातेरेवाडी तसेच बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्था ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे. तसेच मतदार संघातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या संख्येत असल्याने चांदवड – देवळा विधान सभा मतदार संघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी कायम ठेवण्यात यावा . ४ ) चांदवड मतदार संघातील पुणेगांव प्रकल्पाअंतर्गत पुणेगांव कालवा ० ते २५ यातील रुंदीकरण व किमी व २६ ते ६३ यातील कामे रोजगार हमी सारखी पाईप टाकल्याने आज रोजी होणारी प्रचंड कालव्यातील गळती पहाता पुणेगांव प्रकल्पाचे पाणी दरसवाडी धरणात येण्यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी शासनाला सादर करण्यात आललेल्या प्रस्तावास मंजूरी मिळावी . ५ ) पंचायत समिती चांदवड येथील इमारत हि राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या जागेत बांधकाम करावे या पक्षाच्या आग्रही मागणीप्रमाणे मंजूरी देवून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला व आज रोजी इमारत पुर्णत्वास येत आहे . त्याकामी जे वेळोवेळी सहकार्य केले . तसेच ६ ) तसेच मांजरपाडा प्रकल्पाचे काम पुर्णत्वास आणून चांदवड येवला तालुक्यासाठी जे पाणी उपलब्ध करुन दिले त्या बद्दल चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मा.ना. भुजबळ सो , व आपले हार्दीक आभिनंदन . ७ ) विशेष कार्यकारी अधिकारी व शासकीय समित्यावरील अशासकीय सदस्य अद्याप नियुक्ती नाही . कार्यकत्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नेमणुका करण्याबाबत कार्यवाही होणेस विनंती . ८ ) बचत गटाचे तालुका व जिल्हा निहाय संघ निर्मीती करुन बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाच्या विक्रीसाठी पक्षाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करुन देणे . कर्जावरील व्यजदर कमी करणे . या मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. निवेदनावर डॉ सयाजीराव गायकवाड .( तालुका अध्यक्ष),विजय पुंजाराम जाधव(जिल्हा संघटक सचिव ),माजी सभापती अमोल भालेराव, यु . के . आहेर (माजी उपसभापती ) ,रघुआण्णा आहेर (जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद),सुनीलतात्या कबाडे(जिल्हा संघटक ) अल्ताफ तांबोळी,(नगरसेवक, चांदवड ) रिजवान घासी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या