बाजार समिती निवडणूक मुदत संपलेल्या विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामपंचायत मतदारांना औरंगाबाद खंड पिठाचा दिलासा
महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पुढे ढकलली….
महाराष्ट्र राज्यातील निवडणूक लागलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कार्यक्षेत्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायती व विविध कार्यकारी सोसायटी मधील वंचित असलेल्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार मिळावा यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने जनहित याचिकेवर आज औरंगाबाद खंडपीठाने सुनावणी करत महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचा निवडणुकींचा कार्यक्रम हा पुढे ढकलला आहे. यामुळे सर्व मतदारांना दिलासा मिळाला आहे.

