[masterslider id="2"]
लेख विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आदिवासी भागातील नाचणी पीकाचे वैशिष्ट्य

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

आदिवासी भागातील नाचणी पीकाचे वैशिष्ट्य

आदिवासी ग्रामीण भागातील शेतकरी हे पुर्वीपासून डोंगराळ भागात दरीखोरीत परंपरागत पद्धतीने शेती व्यवसाय करीत आहेत. डोंगराळ भागात त्यांनी शेती व्यवसाय करीत शेतात रानात काम करत असताना संपूर्ण शेतातील पीकाबरोबरच निसर्गातल्या प्रत्येक घटकाला मनोभावे जोपासले आहे या निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी वेगवेगळी पीक घेऊन स्वता अन्नदाता शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहेत ही शेती व्यवसायात भात,वरई, उडीद,खुरसाणी, तूर,नाचणी ही पीक डोंगर माथ्यावर खीळवाड व निचऱ्याच्या जमीनीत दर्जेदार उत्पादन देणारी ठरली आहेत त्यात नाचणी हे पीक महत्वाचे आहे नाचणी पीकासाठी रोप मशागतीसाठी डोंगर उतारावर उन्हाळ्यात झाडांच्या फांद्या पानट जाळुन भूज करतात त्याला डांब म्हणतात पहिला पाऊस पडला झाला की मग पेरणी केली जाते पेरणीनंतर साधारण एक महिना रोप वाढीसाठी कालावधी लागतो जुलै ते ऑगस्ट या महिन्यात रोपांची नांगरणी करून लागवड केली जाते त्यानंतर तीन महिन्यांनी नाचणीला कणंस येतात आदिवासी भागातील लोकं नाचणी पीकाला नागली ,कनसरी या आदिवासी शब्दांनी संबोधले जाते नोव्हेंबर महिन्यात ही पीक काढणीस येतात पीकची कणसं मोठी असली तर त्याला मोठ्या बलंग्याची कणंस आहेत असंही म्हणतात नाचणीची भाकरी ही शेरीरासाठी पौष्टिक आहारच ठरते रक्त वाढीसाठी आवश्यक मानले जाते नाचणी पासून पापड तयार करणे आजारी माणसाला पीठाची पेज तयार करून दिली जाते परंतु आदिवासी भागात नाचणी पीकाला आदिवासींची कणसरी म्हणून श्रध्दा ठेवून दरवर्षी वाघबारस सनानंतर पीक काढणी काढणीनंतर किंवा उभ्या असलेल्या पीकाला गोंजारत गावरांन कोंबडं ,नारळ वाहात पुजा अर्चा केली जाते यंदा हे पीक काही भागात कनसांनी भरुन आली आहेत परंतु मध्यंतरी पावसाने झोडपले असल्याने आता नाचणी पीकाला काढणीस वेग आला आहे

सुभाष नारायण कामडी
संशोधक
मो नं ९५७९५४३३०८

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या