[masterslider id="2"]
राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

येवला तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

तालुकाध्यक्ष व कार्याध्यक्षपदी अनुक्रमे “पुण्यनगरी”चे लक्ष्मण घुगे व रविंद्र करमासे तर सरचिटणीस पदी “पुढारी”चे अविनाश पाटील यांची निवड

येवला (दि.१९)- नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ [रजि.] नाशिक संलग्न येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष व कार्याध्यक्षपदी “पुण्यनगरी”चे अनुक्रमे लक्ष्मण घुगे व रविंद्र करमासे तर सरचिटणीसपदी “पुढारी”चे अविनाश पाटील उर्फ बंडुनाना शिंदे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
येवला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या येवला शाखेची द्विवार्षिक निवडणूक आज दि.१९ रोजी बिनविरोध पार पडली.जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी जिल्हा पदाधिकारी भाऊलाल कुडके व विद्यमान तालुकाध्यक्ष संतोष विंचू सर उपस्थित होते.कवी शिवाजी भालेराव यांनी स्वागत व बैठकीचे सुत्रसंचलन केले.यावेळी झालेल्या निवडणूकीत येवला तालुका मराठी पत्रकार संघाची बिनविरोध निवडून आलेली नुतन कार्यकारणी घोषित करण्यात आली.

सर्वांची निवड घोषित झाल्यानंतर संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार,जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांचे हस्ते नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.

 

निवड करण्यात आलेली कार्यकारिणी
तालुकाध्यक्ष: लक्ष्मण घुगे, कार्याध्यक्ष: रविंद्र करमासे, उपाध्यक्ष: सुदाम गाडेकर, राजेंद्र शेलार व विलास पगारे,
सरचिटणीस: अविनाश शिंदे-पाटील,
सहसरचिटणीस: धर्मा पारखे,
खजिनदार: नारायण गुंजाळ,
सहखजिनदार : बापूसाहेब वाघ,
संघटक: प्रमोद पाटील,
सहसंघटक: देवराम कदम,
समन्वयक: मनोज पटेल,
सहसमन्वयक: गोरख घुसळे,
कार्यकारिणी सदस्य :
दीपक सोनवणे,अनिल अलगद,दीपक ढोकळे,एकनाथ भालेराव,भगवान रोठे,अनिल जाधव तर प्रसिद्धी प्रमुख : अनुराग जोशी यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी माजी अध्यक्ष राकेश गिरासे,जिल्हा प्रतिनिधी भाऊलाल कुडके,कुमार गुजराथी,पांडुरंग शेळके,भिमाजी शिंदे,संतोष घोडेराव,योगेश गंडाळ,अनील बैरागी,
राजू परदेशी,रोहन वावधने,जयंत केंगे,प्रवीण खैरणार,सुदर्शन खिल्लारे,मुकुंद आहिरे,अनिल जाधव आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या