[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

गुजरखेडे सरपंचाची वचनपूर्ती

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

आडगांव रेपाळ (वार्ताहर):-शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास रेशन कार्ड लागतेच आणि ग्रामिण भागात या गोष्टीचा दुष्काळ हिच गरज ओळखुन गुजरखेडे येथील सरपंच बापूसाहेब गंगाधर चव्हाण _यांनी निवडणुकीपूर्वी मतदारांना शब्द_ दिला होता की, ज्या ग्रामस्थांना रेशन कार्ड नाही अशा ग्रामस्थांना रेशन कार्ड काढून देणार. मतदारांनी साथ दिली, बापुसाहेब चव्हाण सरपंच झाले, पण जनतेला दिलेला शब्द विसरले नाही. गावातील तब्बल 57 आदिवासी, मजूर , कष्टकरी कुटुंबांना रेशन कार्ड काढून दिले. येवला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदय मा. ना. छगनराव जी भुजबळ यांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आले. या प्रसंगी येवल्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार मा. प्रमोदजी हीले साहेब , पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे साहेब उपस्थित होते. या कामात येवल्याचे युवा नेते संभाजी राजे पवार , पंचायत समिती सभापती प्रवीण भाऊ गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास रेशन कार्ड लागतेच. कार्ड नसल्यामुळे बरेच लोक वंचित राहतात. पण आता कार्ड मिळाल्यामुळे शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या गाय म्हैस, शेळी मेंढी पालन या योजनेचा तब्बल 20 लाभार्थ्यांना लाभ मिळेल.या कामामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या