येवला (नारायण गुंजाळ ) समग्र शिक्षा अंतर्गत राज्यात महात्मा गांधी यांना ३० जाने.०२२ रोजी प्रत्येक शाळेमध्ये हुतात्मा दिन साजरा करण्याच्या शासनादेशानुसार जि.प.प्राथ.शाळा आडगाव रेपाळ ता.येवला येथे विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.म.गाधी यांच्या प्रतिमेचे पूजन नवनिर्वाचित उपसरपंच व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण यादवराव निकम व ग्रा.पं.सदस्य रेखा गोरख जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी महात्मा गांधी यांचे आवडते भजन रघुपति राघव राजाराम..हे भजन गायन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांची भाषणे,कविता,भजनगायन,निबंधलेखन,राष्ट्रभक्तीपर गीतगायन व चित्रकला अशा विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच म.गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११.०० वा.पद्मश्री श्री.कुमार केतकर,आणि श्री.आशुतोष शिर्के यांचे युगपुरुष म.गांधी या विषयावरील व्याख्यान विद्यार्थी व शिक्षक यांनी शालेय टी.व्ही.संचावर ऐकले,पाहिले.यावेळी गावच्या सरपंच सुनिता तुकाराम गुंजाळ,माजी सरपंच नारायणजी गुंजाळ,ग्रा.पं. सदस्य व शा.व्य.स.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल,मुख्या.शिवाजी आहेर,सुरज झाल्टे,विकास कदम,संदीप चव्हाण,राहुल चौधरी आदी उपस्थित होते.

