तरूणांसाठी मूल्यशिक्षण, संस्कार आत्मसात करण्यासाठी श्रमसंस्कार महत्त्वाचे- डॉ रवींद्र राजपूत
मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनचे श्रमसंस्कार शिबिर चांदवड तालुक्यातील शिंगवे मतोबाचे येथे सुरू झाले.
या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड येथील बालरोग तज्ञ डॉ. रवींद्र राजपूत उपस्थित होते. शिंगवे विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. अनिल आहिरे ग्रामपंचायत सदस्य श्री संजय खताळ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर, महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. सतीश तांबे, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी डॉ. रवींद्र राजपूत यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. समाजामध्ये तरुण हा महत्त्वाचा दुवा समजला जातो. आजच्या तरूणाने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षण, संस्कार हे आत्मसात करणे गरजेचे आहेत व त्याचबरोबर समाजाविषयी आदर भाव असणेही गरजेचे आहे. तसेच उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका आणि उद्देश सांगितला. त्याचबरोबर आजच्या तरुणांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनामुळे एक चांगला तरुण घडतो. ग्रामीण भागातील रूढी-परंपरा आजच्या तरुणांना अवगत होण्यास मदत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शिबिराची उद्दिष्टे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.गणेश गांगुर्डे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापिका वर्षाराणी पेढेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक सोमनाथ अहिरे व रासेयो स्वयंसेविका अक्षदा पगारे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.

