चांदवड – तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरीत खरीप पिक कर्ज मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांचेकडे
नासिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस व मगरुळ / भरवीर सोसासटीचे माजी सभापती व संचालक विजय पुंजाराम जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे . नाशिक येथे राष्ट्रवादी भवनात उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार बैठकीस आले असता या मागणीचे निवेदन देण्यात आले . यावेळी पालकमंत्री नामदार छगन भुजबळ , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड .रविंद्र पगार उपस्थित होते .
या निवेदनात गतकाळात कर्जमाफी झाल्यामुळे जिल्हयातील हजारो शेतकरी यांना लाभ झाला असून विविध कार्यकारी सोसायटयाच्या करोडो रुपयाच्या ठेवी नासिक जिल्हा बँकेत डिपॉजीट म्हणुन पडुन आहेत. संस्थाच्या ठेवी जिल्हा बँकेत असुन देखील बहुतेक शेतकरी कर्जापासुन वंचित आहे. बँकेची आर्थिक परिस्थीती चांगली नसल्यामुळे पिककर्ज व मध्यमुदत कर्जापासुन वचीत आहे .तरी या प्रश्नी लवकर योग्य तो निर्णय घेऊन शेतकरी याना विविध कार्यकारी सोसायटी मार्फत कर्जपुरवठा करण्यात यावा विजय पुजाराम जाधव यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .

