[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक महोत्सवात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मूर्ती निर्माण कमिटीने दिले निमंत्रण

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक महोत्सवात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मूर्ती निर्माण कमिटीने दिले निमंत्रण

मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव 108 फुट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव 15 जून ते 30 जून 2022 या कालावधीत होणार आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी साहेब यांना मांगीतुंगी येथील भगवान वृषभनाथ महामस्तकाभिषेक महोत्सव निमंत्रण कार्यक्रमाची पत्रिका देण्यात आली त्याच बरोबर सर्व मंत्री महोदय मुख्य सचिव शासकीय यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख या सर्वांना देखील कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे.
108 फुट भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी पीठाधीश रवींद्रकिर्ती स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठता सी.आर.पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, कार्याध्यक्ष अनिल जैन,महामंत्री भूषण कासलीवाल, जीवनप्रकाश जैन,ॲड.रवींद्र पगार, महेंद्र काले ,बाळासाहेब कासलीवालआदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या