जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथे गणूर येथे श्रीराम घाटावरती (दशक्रिया विधीघाट ) वृक्ष लावगड संपन्न
चांदवड ( प्रतिनिधी ): – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एम सी एल कंपनी व केद्राई माता फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या पुढाकाराने व गणुर ग्रामपंचायतीच्या समन्वयाने गणूर येथील नव्याने बांधलेला श्रीराम घाट (दशक्रिया विधी ठिकाण) या ठिकाणी MCl कंपनीचे ग्रामउद्योजक शुभम अंबादास शिंदे यांच्या पुढाकाराने भारतीय जातीच्या वेगवेगळ्या झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वड चिंच पिंपळ कडुलिंब पापडी इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सीए शांताराम ठाकरे मा.शिवसेना तालुका प्रमुख , पी पी सोमवंशी वनपाल चांदवड , एस के खंदारे वनरक्षक , विजय टेकणार वनरक्षक ,वाल्मिक व्हलगर वनरक्षक , पूनम साबळे वनरक्षक , कॅम्रेड संपतराव जाधव , अशोक शिंदे शिवसेना उपतालुकख प्रमुख चांदवड , तसेच एम सी एल कंपनी तालुका डीलर ,केद्राई माता फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चांदवड. संचालक सौ अनिता तिपायले , सौ वंदना जाधव. तसेच ग्राम उद्योजक शुभम शिंदे ,अण्णासाहेब काळे विलास कोल्हे, गोरख आहेर सर, संजय आहेर, हेमंत शिंदे , विशाल बरकले ,सुरेश पाटील ,संकेत मांदले , ज्ञानेश्वर न्याहारकर , कैलास गुंजाळ ,माधव गांगुर्डे , राहूल ठोके तसेच सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे गावातील सर्व विद्यमान व माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे विद्यमान चेअरमन रामकीसन शिंदे त्याचप्रमाणे सोसायटीचे नवनियुक्त संचालक त्याचप्रमाणे ग्रामस्थ अंबादास शिंदे, मनोज शिंदे, सुधाकर शिंदे, रवींद्र शिंदे ,दत्तू सवनदरे ,निवृत्ती सवदंरे ,अशोक सवनदरे, कैलास सवदंरे ,रामदास ठाकरे, संतोष ठाकरे ,शिवाजी ठाकरे ,भास्कर ठाकरे, पांडुरंग गोविंद ,राजेंद्र गांगुर्डे ,कांताराम गांगुर्डे, सुनील शिंदे ,नितीन शिंदे ,बाळासाहेब सवदंरे ,हरिभाऊ सवनदरे , पंढरीनाथ ठाकरे, रामकिसन शिंदे, सत्यवान ठाकरे, दौलत ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी सीए शांताराम ठाकरे व श्री तिपायले यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रामुख्याने श्रीराम घाट हा गणुर ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नव्यानंच उभा केलेला आहेत
या ठिकाणी गावातील ग्रामस्थांनी एक घरचे कार्य म्हणून वृक्षाची लागवड संगोपन व संवर्धन केले पाहिजे . गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून एक तरी झाड श्रीराम घटावरती लावावे व त्या वृक्षाचे कुटुंबातील सदस्य प्रमाणे संगोपन जोपासना करावी.वृक्ष आहे तर मानवी जीवन आहे झाडे लावा झाडे जगवा हे नुसता ब्रीदवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत ते उतरले पाहिजे असे आव्हान उपस्थितांना केले.यापुढे ही आवश्यक असेल तेथे ग्रामपंचायत वृक्ष लागवडी साठी प्रयत्न करेल असे मतव्यक्त केले

