[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

बाजारातून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करण्याचे चांदवड तालुका कृषी विभागाने केले शेतकऱ्यांना आवाहन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

बाजारातून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करण्याचे चांदवड तालुका कृषी विभागाने केले शेतकऱ्यांना आवाहन

कृषी सेवा केंद्रांमधून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.

चालू खरीप हंगाम मध्ये शेतकरी बांधवांनी कृषी सेवा केंद्र,महाबीज अथवा व्यापाऱ्यांकडून सोयाबीन बियाणे खरेदी केल्यानंतर त्या बियाण्याची घरच्या घरी उगवण क्षमता तपासून घ्यावी तसेच बियाणे ओलसर जागेवर ठेवण्यात येऊ नये.बियाणे खरेदी पासून ते पेरणी पर्यंत आदळ आपट होणार नाही याची दक्षता घ्यावी . बियाणांवर खते अथवा कुठल्याही प्रकारची जड वस्तू ठेवण्यात येऊ नयेत. बियाण्याच्या पिशवीमध्ये असलेल्या थायरमची पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून घ्यावी.वाणांच्या शिफारशीनुसार एकरी बियाणे वापरण्यात यावे. साधारणता ८० ते १००मिलिमीटर पाऊस पडल्या शिवाय पेरणी करण्यात येऊ नये. ३ ते ५ सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरणी करू नये.पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत पेरणी करावी,बीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यात यावी,त्यामुळे एकरी बियाणे कमी प्रमाणात लागते व उत्पादनात वाढ होते.

शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करतेवेळी खरेदीचे पक्के बिल घ्यावे,तसेच पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी.८०-१००मिमी पाऊस पडल्यावरच पेरणी करावी.पेरणीची घाई करू नये.पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचा वापर करवा.
– विलास सोनवणे,तालुका कृषी अधिकारी,चांदवड

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या