[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

ईगतपुरी एस.टी.आगाराचा अनागोंदी कारभाराचा प्रवाश्यानां तीव्र फटका

ईगतपुरी एस.टी.आगाराचा अनागोंदी कारभाराचा प्रवाश्यानां तीव्र फटका

ईगतपुरी -(नवनाथ गायकर )

एकिकडे शासन एस.टी.महामंडळाच्या वाहतुकीस प्रोत्साहन देत असतानाच विविध घटकावर सवलतीचा वर्षाव करत आहे. दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवर एस.टी.प्रशासनाच्या अनागोंदी व ढिसाळ कारभाराचा तीव्र फटका मात्र नागरिकांना बसत आहे. ईगतपुरी एस.टी.आगाराच्या अनागोंदी कारभाराबाबत वाढत्या तक्रारी असुन आगाराने वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी प्रवाश्यानीं केली आहे.
कोरोना महामारीचा कालखंड व त्यानंतर दीर्घकाळ चाललेला एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप याचा तीव्र फटका यापूर्वी च एस.टी.बसला आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी एकदाची रस्त्यावर धावायला लागली आहे.

मात्र सेवा ठप्प असल्याचे प्रदीर्घ कालखंडानंतर एस.टी.प्रशासनाने नव्याने योग्य नियोजन आखुन एस.टी.फेर्याचें नियोजन करणे आवश्यक होते.
मात्र वेळेवर बसेस न सोडणे, नियोजित बसेस अकस्मात रद्द करणे, बसेस उशीरा धावणे, बसेसच्या दुरुस्ती कडे अक्षम्य दुर्लक्ष करणे, गरजेच्या मार्गावरील बस फेर्या बंद करणे, काही ठराविक मार्गावरच बस सोडणे, एकाच मार्गावर एका पाठोपाठ बस सोडणे आदी प्रकारामुळे ईगतपुरी आगाराची वाहतूक व्यवस्था च कोलमडल्याचे दिसत आहे.याशिवाय आगार ईगतपुरी चा मात्र ईगतपुरी तालुक्यातील वाहतूक व्यवस्थेवर लक्ष देण्याऐवजी सातत्याने नियोजित फेर्या बंद करुन बसेस लांब पल्ल्याच्या ठिकाणी पाठवल्या जातात. या काळात तालुक्यातील फेर्या चें कोणतेही नियोजन केले जात नाही.


दरम्यान यामुळे प्रवाशांना इच्छा नसुन ही नाईलाजाने खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो. यात प्रवाशाचीं लुट ही होत असुन शिवाय सुरक्षित प्रवासाची कोणतीही हमी नसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.ही सर्व परिस्थिती एस.टी.च्या ढिसाळ कारभारामुळे उत्पन्न झाल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत आहे.

दरम्यान दुसरीकडे या अनागोंदी कारभारामुळे शालेय विदयार्थ्याचें मात्र प्रचंड हाल होत आहे. अकस्मात बसेस रद्द होत असल्याने शैक्षणिक प्रवास पास काढुनही नाईलाजाने पुन्हा खाजगी वाहतुकीवरही पैसा खर्च करावा लागतो आहे. याचा हकनाक फटका पाल्य व पालक यांनाही बसत असुन यामुळे शैक्षणिक नुकसान ही होत आहे.
तसेच शालेय विदयार्थ्यासांठी शासनाने खास मानवधन विकास च्या बसेस सोडलेल्या आहेत. मात्र या बसेस नियमित वेळेवर धावण्याऐवजी उशीराने धावत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शालेय विदयार्थ्याच्यां सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकला आहे. या मधल्या वेळात काही नको तो अनुचित प्रकार घडला तर यांस जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालक करत आहेत.
दरम्यान शालेय स्तरावर ईगतपुरी आगाराला वेळेवर बसेस सोडण्याची सातत्याने विनंती करुन ही या मागणीला चक्क केराची टोपली दाखवल्याचे सांगत शिक्षकानीं शाळा सांभाळायची कि शाळेतून सुटलेल्या या विदयार्थ्याचीं काळजी करीत बसायचे असा खडा सवाल केला आहे.

आगार व्यवस्थापक नाँट रिचेबल ?

दरम्यान याबाबत तक्रारी साठी आगार व्यवस्थापक हे बर्याचवेळा नाँट रिचेबल असतात. किंवा केलेल्या फोनला प्रतिसाद देत नाही अशा तक्रारी प्रवासी करत आहेत.
बर्याचदा तक्रारीनां कनिष्ठ कर्मचारी च सामोरे जातात.


आगाराचा कारभार बेजबाबदार पणाचा
ईगतपुरी आगाराचा कारभार अत्यंत बेजबाबदार झालेला असुन येथील कारभाराला कुठलाही धरबंध राहिलेला नाही.
याचा तीव्र फटका प्रवाशांना बसतो आहे. आगाराने आपल्या कारभारात सुधारणा करावी.

-एकनाथ नारायण पा. गायकर
प्रवासी

शालेय विदयार्थ्याचीं सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. लांबवरुन येणाऱ्या शालेय विदयार्थ्यानां आम्ही बसेसच्या वेळेनुसार वेळेवर सोडतो.विद्यार्थी बस थांब्यावर असतात. तर आम्ही शालेय वेळापत्रकानुसार स्थानिक व जवळपासच्या विदयार्थ्याचा अभ्यास घेत असतो.
बसेस वेळेवर येत नसल्याने तास दोन तास विदयार्थ्यानां प्रतिक्षा करावी लागते. मात्र या काळात त्यांची सुरक्षितता मात्र धोक्यात असते.
उदया या वेळेत काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण ?

रघुनाथ पा.खातळे
संचालक म.शि.वि.मंडळ.

लेखकाबद्दल

पत्रकार नवनाथ गायकर - इगतपुरी

एक टिप्पणी द्या