अहिल्यादेवी पतसंस्थेच्या सभासदांना १0 टक्के लाभोश जाहीर
चांदवड येथील अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेच ची ३५ वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बद्रीनारायण जाधव , यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी दीप प्रज्वलन , प्रतिमा पुजन करून दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचन व्यवस्थापक संजय ढवण यांनी केले. त्यानतंर अहवालवाचन, नफा- तोटापत्रक ,ताळेबंद -पत्रक , अंदाजपत्रक, लेखापरीक्षण अहवाल , लेखापरीक्षक नियुक्ती, नफा वाटणी लेखापरीक्षण अहवाल आदि विषयपत्रीकेनुसार सर्व विषयाचे सविस्तर विवेचन करण्यात आले. यावेळी सभासदामा १0 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. तसेच सभासदांचे शेअर्स मूल्य 3000 रुपये प्रतेकी करून घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला. संस्थेचे संस्थापक शिरीषभाऊ कोतवाल, व्हा चेअरमन बाबुराव सोनवणे , यशोदीप घमेंडी, सचिन अग्रवाल ,डॉ. देवरे रत्नदीप बच्छाव , अश्फाक तांबोळी ,सुनील कोकणे, संतोष भालेराव उपस्थित होते .
सूत्रसंचालन पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय ढवन यांनी केले. त्यांना सहकार्य सचिव संजय शेळके यांनी केले. आभार व्हा चेअरमन बाबुराव सोनवणे यांनी मानले. यावेळी प्रमुख उपस्थितीत दत्तात्रय राऊत, विजय शेळके ,नंदू कोतवाल , कैलास कोतवाल, उतम पवार , आझादभाई , बाळासाहेब ठाकरे, पोपट गांगुर्डे ,पुंडलिक कोकणे , मोहन कोकने, सुनील कोकने, सतीश गुजराथी ,विनायक ठाकरे , योगेश, बोरसे ,बाळू म्हस्के,,नामदेव पवार , सचिन कोतवाल ,सागर शिंदे शुभम शेळके ,अतुल सोनवणे, वैभव शिंदे आदी सह सभासद उपस्थित होते.

