दरेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
दरेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रवींद्र सूर्यभान गांगुर्डे होते, तर सभेत सचिव बी. एस . व्हडगर यांनी विविध प्रकारच्या सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. दरेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील हनुमान मंदिरात पार पडली. प्रथम सचिव बी.एस. व्हडगर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यावर चर्चा केली व ते कायम करण्यात आले .त्यानंतर सन 2021 -२३ या वर्षाचे तेरिज, ताळेबंद पत्रक ,नफा- तोटा पत्रक वाचून कायम करण्यात आले. सन 2022 -23 या सहकारी वर्षाकरिता अंदाजे बजेट मंजूर करण्यात आले. शासकीय हिशोब तपासणी अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल वाचून कायम करण्यात आला. सन 2023- 24 या वर्षाकरिता क. म पत्रक तयार करून बँकेकडे पाठवणे व बाहेरील कर्ज मर्यादा ठरवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. थकबाकीदार सभासदांच्या यादीचे वाचन करण्यात आले व लेखापरीक्षक नेमणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. ३१/ ३ /२०२२ पर्यंत आकारलेल्या डेड स्टॉक झिझेला मान्यता देण्यात आली. यावेळी उपस्थित सभासदांनी शेअर संदर्भात माहिती घेतली तसेच शासनाच्या नियमित कर्जदारांसाठी असणाऱ्या प्रोत्साहन पर अनुदानासंदर्भात माहिती घेतली.
यावेळी संस्थेचे चेअरमन रवींद्र गांगुर्डे, संचालक संजय गांगुर्डे, भाऊसाहेब देवरे ,राजेंद्र देवरे , विक्रम गांगुर्डे, भाऊसाहेब जाधव ,एकनाथ अहिरे ,लिपिक महेंद्र गांगुर्डे आदी संस्थेच्या वतीने सहभागी झाले होते .तर सदर सभेत प्रमुख उपस्थिती म्हणून दगू पाटील देवरे, बबन गांगुर्डे ,रावसाहेब देवरे, विक्रम देवरे, संदिप देवरे ,दत्तू पगार,बाळकृष्ण देवरे , भागवत पगार, धनु गव्हाणे, दौलत पगार , , बाळासाहेब गांगुर्डे ,कानू पगार , सुनील पगार ,कारभारी देवरे, रामचंद्र अहिरे ,दादाजी देवरे ,गोरख पगार,बबन गांगुर्डे, मच्छिंद्र गव्हाणे यांचा अनेक सभासद उपस्थित होते.

