[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वाद- वराडी पॅटर्न – चांदवड तालुकयातील टंचाई मुक्त गावात साडेआठ लाख रुपये खर्च करून उभारला पावणेदोन कोटी लिटराचा साठवण तलाव

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

तुषार्त वाद – वराडीकरांना आता मिळणार उन्हाळ्यातही हक्काचे पिण्याचे पाणी

वाद- वराडी पॅटर्न – चांदवड तालुकयातील टंचाई मुक्त गावात साडेआठ लाख रुपये खर्च करून उभारला पावणेदोन कोटी लिटराचा साठवण तलाव

चांदवड ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील वाद वराडी या गावात ग्रामपंचायतीने इतरत्र पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून न राहता स्वतःच्या पिण्याच्या पाण्याचा साठा निर्माण करण्याचा दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सातत्याने दरवर्षी उन्हाळ्यात टँकरची आवश्यकता असणाऱ्या या गावाला आता स्वतःचे हक्काचे पाणी उपलब्ध झाले आहे. एकीकडे लाखो रुपये खर्चून पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायतींना वाद वराडीचा पाणी साठवणीच ” साठवण तलाव “ हा पॅटर्न निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. या कामाचे कौतुक होत असून आतापर्यंत अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधींनी येथे भेट देऊन या तलावाची पाहणी केली आहे. रणरणत्या उन्हात हंडावर पाण्यासाठी दिवसभर हातपंपावर किंवा दोन – चार किलोमीटर शेतातून पाणी आणण्यासाठी पायपीट करणाऱ्या महिलांना उन्हाळ्यातही घरबसल्या आता पाणी मिळणार आहे . चांदवडचे गटविकास अधिकारी महेंद्र पाटील , माजीउपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भगवान खताळ , ग्रामसेवक एम. आर. डांगरे व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेला हा वाद – वराडी पॅटर्न निश्चितच चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील कायमस्वरूपी दुष्काळी गावांनी राबविल्यास टंचाई मुक्तीकडे घेऊन जाणारा आहे. ग्रामपंचायतीने साडेआठ लाख रुपये खर्च करून पावणेदोन कोटी लिटरचा कुत्रिम साठवण तलाव निर्माण केला असून त्याचे मजबूत अशा प्लास्टिक अच्छादन अस्तरीकरण करून उन्हाळयात दरवर्षी पाणीपुरवठा टँकर द्वारे होण्यासाठी करण्यात येणाऱ्या लाखो रुपयांचा खर्चात आता बचत होणार आहे. सदर साठवण तलावाच्या सुरक्षिततेसाठी जाळीचे कंपाऊंड करण्यात आले असून सदर तलाव उंच जागी बांधल्यामुळे ग्रॅव्हिटीने मुबलक पाणी मिळत आहे .त्यामुळे कायमस्वरूपी दुष्काळी ही ओळख या गावाची आता पुसली जाणार आहे. वाद, वराडी हि गावे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या पुर्वेकडे साधारण ४० किमी. अंतरावर चांदवड व मालेगाव या दोन तालुक्याच्या शिवेवर छोटीशी गावे आहेत.दोन्ही गावांची मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत आहे.ग्रामपंचायत कार्यालय वाद गावात आहे.दोन्ही गावांची मिळून १६१२ इतकी लोकसंख्या आहे.वाद गाव हे गावठाण,लभडे,बरकले वस्ती,हरपडे वस्ती,खताळ वस्ती,सोनावणे वस्ती,भालेराव वस्ती अशा भागात वसलेले आहे.वाद व वराडी या दोन्ही गावाची एकूण कुटुंब संख्या ३२५ असून त्यापैकी गावठाणात ७८ कुटुंबे राहत असून उर्वरित २४७ कुटुंबे मळ्यात राहताट .०४ हातपंप व २ सार्वजनिक विहिरी असून गाव ४२ खेडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट आहेत मात्र मागील २ वर्षापासून सदरची योजना बंद आहे.

वाद वराडी ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त आयोगातून केलेला साठवण तलाव

वाद वराडी हि दोन्ही गावे अवर्षण प्रवार्षण भागातील आहे दोन्ही गावांना साधारणपणे उन्हाळ्यातील एप्रिल ते जून या कालावधीत पाण्याची टंचाई जाणवते त्यामुळे या भागात उन्हाळी पिके घेतली जात नाहीत शेतीसाठी पाऊस पडल्यानंतर साधारण जानेवारी अखेर पर्यंत पाणी पुरते .पूर्वीचा इतिहास लक्ष्यात घेता चांदवड तालुक्यात टँकरची गरज या दोन्ही गावांना भासते, यावर उपाययोजना म्हणून मागील दहा वर्षापूर्वी दोन्ही गावात पाणलोट विकास क्षेत्राचे कामे करण्यात आली. या कामांमुळे जमिनीत पाणी साधारण पूर्वीपेक्षा तीन महिने जास्त टिकून राहते. मात्र उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायन राहिला
कोरोना काळात हि अडचण जास्तच अवघड झाली.त्यामुळे या अडचणीवर कामस्वरूपी उपाययोजना करणेबाबत चर्चा करण्यात आली व मार्गदर्शन घेण्यात आले. ग्रा.पं.ने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे साठी १५ व वित्त आयोगाचे बंधित निधीतून पाणी साठवणे करिता व गावाची गरज लक्षात घेऊन सन २०२०/२१ चे कृती आराखड्यात पाणी साठवण तळे व त्यासाठी कंपाऊंड व प्लास्टिक कागद ताक्नेचे कामे समाविष्ट केली. त्यानुसार ग्रा.पं.ने हि कामे पूर्ण करून २६जानेवारी रोजी पाणी साठवण तळे पूर्ण क्षमतेने भरून पूर्ण केले. सदर कामासाठी तत्कालीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.आपल गाव आपला विकास हि वाक्ये नुसती कागदावर न राहता त्याचा कृतीतून अर्थ समजावून .महेश पाटील सो.गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदवड यांनी गाव विकास आराखडा तयार करताना सखोल मार्गदर्शन केले. दरवर्षी टँकर लागत असल्याने गावाची ओळख कायमस्वरूपी दुष्काळी गाव अशी झाली.ती ओळख कमी करण्यासाठी ग्रा.प ने पाणी साठवण तळे करण्याचे काम कृती आराखायात समाविष्ट केले.सदरचे काम पूर्ण करण्यासाठी महेंद्र पाटील साहेबांनी खूप मोलाचे सहकार्य केले.

महेंश पाटील, गटविकास अधिकारी चांदवड

वाद वराडी गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षाला सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्च येत होता. साठवण तलावातील प्लास्टिक कागदाची वयोमर्यादा सुमारे दहा वर्ष असून पुढील दहा वर्षात शासनाचे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची बचत होणार आहे. ही योजना पूर्व भागातील परिसरातील गावांनाही राबवण्याचा विचार आहे. – महेंश पाटील , गटविकास अधिकारी ,चांदवड.

 

भगवान खताळ ग्रामपंचायत सदस्य वाद वराडी

आमचे गाव हे कायमस्वरूपी टंचाई ग्रस्त गाव असल्याने आमच्या गावाकडे इतर गावातील लोकांचा कल हा उपेक्षित नजरेचा असल्याने त्याची नेहमी खंत वाटायची त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मनोमन इच्छा होती. उन्हाळ्यात पिण्याचे पाण्याची टंचाई जाणवते.त्यामुळे उन्हाळ्याचे दिवसात पाणी साठा कसा राहील या दृष्टीने नियोजन केले. भविष्यात गावास फिल्टर पाणी देनेबाबत नियोजन करणार आहोत. – श्री भगवान मारुती खताळ ग्रा .प .सदस्य ,वाद.

पाण्याचा ताळेबंद :

वाद व वराडी या दोन्ही गावांची एकूण लोकसंख्या = १६१२
पाण्याचा ताळेबंद :
वाद व वराडी या दोन्ही गावांची एकूण लोकसंख्या = १६१२
दोन्ही गावांची दैनंदिन पाण्याची गरज = ८८६६० लिटर प्रती दिन
टंचाई सदृश कालावधी = माहे एप्रिल ते जून ०३ महिने
०३ महिन्यासाठी दोन्ही गावांची पाण्याची गरज = १,५९,५८,८०० लिटर
ग्रा.प.ने साठवून उपलब्ध झालेले पाणी = १,६३,८०,००० लिटर
५% मृत साठा शिल्लक ठेवता ३ महिने पुरेसे पाणी मिळते
टंकर चा हिशोब केल्यास ग्रा.प.कडे १०००० लिटर क्षमतेचे १५०० टंकर पाणी बाजार मूल्याप्रमाणे २०००/- प्रती टंकर प्रमाणे ३०,००,०००/- रु. रकमेचे पाणी साठवणूक केलेले आहे
ग्रा.प.ने सदर कामावर केलेला एकूण खर्च =
एकूण खर्च = ८,५०,०००/-
टंचाई कालावधीत शासन स्तरावरून टंकर सुरु केल्यास सदर कामामुळे दरवर्षी होणारी बचत = दैनंदिन ४ टंकर प्रती टंकर खर्च ३०००/- प्रती टंकर प्रमाणे दैनंदिन खर्च – १२०००/-
३ महिन्यासाठी होणारी बचत = १०,८०,०००/-
दरवर्षी संभाव्य ३ महिने टंचाई कालावाधी ग्राह्य धरून
पुढील ५ वर्षात होणारी बचत = ५४.०० लक्ष रुपये

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या