कवी रावसाहेब जाधव यांच्या पुस्तकास संत नामदेव राष्ट्रीय बालकाव्य साहित्य पुरस्कार जाहीर

कवी रावसाहेब जाधव
चांदवड, येथील कवी रावसाहेब जाधव यांच्या गरगर मोळ्या या त्रैभाषिक बालकविता संग्रहास संत नामदेव राष्ट्रीय बालकाव्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
वर्ष २०१७ ते २०२१ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींतून संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासाठी विविध प्रकारातील साहित्य कृतींची निवड करण्यात आली; अशी घोषणा संयोजक प्रा. डॉ. श्रीराम कऱ्हाळे, मराठी विभागप्रमुख, शिवाजी महाविद्यालय, हिंगोली यांनी केली. त्यात कवी रावसाहेब जाधव यांच्या वर्ष २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या गरगर मोळ्या या त्रैभाषिक बालकाव्य संग्रहाचा समावेश आहे.

कवी रावसाहेब जाधव यांच्या प्रकाशित झालेल्या ढेकूळ आणि गरगर मोळ्या या पुस्तकांना यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत..
या पुरस्काराबद्दल कवी रवींद्र देवरे, कवी सागर जाधव जोपुळकर, कवी जनार्दन देवरे आबा, प्रकाशक रवींद्र पाटील, अनुवादक राहुल केदारे, अनुवादक कवी संजय बोरुडे, तसेच चांदवडी रुपय्या प्रतिष्ठानच्या अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले…

