[masterslider id="2"]
क्रीडा जाहिरात विशेष लेख संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हितगुज

सात वर्षांच्या प्रणालीचा आगळा वेगळा वाढदिवस.. काय केलं तिनं.? अवश्य वाचा..😊

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आज प्रणाली चा सातवा जन्मदिवस त्यानिमित्ताने सीड बॉल🪴 आणि छोटी कुंडी🗑️ एक विघटन होणारी बॅग झाडं लावण्यासाठी या वस्तू वर्गात दिल्या. वर्गातील मुलांना प्रत्येकाला एक झाड लावायला सांगितले. जेणेकरून वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण होईल🌲पर्यावरण चांगले राहील🌏,वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होईल. मुलांना पर्यावरण याविषयी माहिती वाढेल मुलांना पर्यावरण याविषयी माहिती होईल. मुले निसर्गाच्या सानिध्यात राहतील आतापासून मुलांना आपण असे संस्कार दिले तर उद्या मुलांना जबाबदार नागरिक🏃‍♂️ आणि निसर्गातील एक महत्त्वाचा दुवा आहोत. आपण निसर्गाप्रति 🌎 काहीतरी दिले पाहिजे या उद्देशाने एक जबाबदार👨‍👩‍👦 पालक म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न आम्ही केला.

मी तुला 🌊 पाणी देते,

तू मला सावली ☂️ व ऑक्सिजन दे

हे घोषवाक्य मुलांकडून म्हणून घेतले ज्या मुलाचे झाड🌳 सगळ्यात आधी मोठे होईल त्या मुलाला बक्षीस मिळेल हे पण हे सांगून मुलांनी झाड लावावे झाड व्यवस्थित वाढवावे, त्याची काळजी घ्यावी संगोपन करावे, हे सांगितले मुलांनीही चांगला प्रतिसाद दिला तसेच माननीय मिनाक्षी गायधनी मॅडम शाळेच्या 🏢 मुख्याध्यापिका यांनी प्रणालीला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आमच्या या छोट्याशा उपक्रमाला साथ दिली वर्गशिक्षिका सौ सोनिया देवरे मॅडम यांनीही मुलांना पर्यावरणाविषयी समजून सांगितले मुलांशी बोलण्यासाठी त्यांनी आम्हाला वेळ दिला व प्रणालीला शुभेच्छा दिल्या तसेच वैदिक गणित शिकवणाऱ्या सौ हर्षदा पाटील मॅडम आम्हाला भेटल्या त्यांनीही प्रणालीला शुभेच्छा दिल्या व या छोट्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच बसची सेवा देणारे वाहक-चालक 🚌 मामा व मावशी यांनीही प्रणालीला शुभेच्छा दिल्या..

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या