कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रु विशेष अर्थसहाय्य अनुदान देण्याची आ. डॉ. राहुल आहेर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
कमी असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला असून त्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अशा स्थिती मध्ये शेतक-यांना ५०० रु. प्रती क्विंटल आर्थिक मदत देवून दिलासा द्यावा अशी मागणी चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन केली आहे 
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,उपरोक्त विषयान्वये नाशिक जिल्ह्यात शेतकरी प्रामुख्याने कांदा उत्पादक आहे. सध्यस्थिती मध्ये कांद्याचे बाजारभाव ५०० ते ७०० रु. प्रती क्विंटल आहे. भरघोस उत्पादन, वाढलेली साठवण क्षमता, काही परदेशी बाजार पेठांमध्ये बिघडलेली आर्थिक स्थिती, रशिया- युक्रेन युद्ध असे काही कारणे ह्या साठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. केंद्र व राज्य सरकार नेहमीच कांदा उत्पादक शेतक-याला मदत करण्यासाठी निर्यात धोरण, नाफेड कांदा खरेदी व ईतर मार्ग अवलंबत असते. पण तरी सध्यस्थिती मध्ये बाजारपेठेत कांदाभाव अत्यंत कमी आहे.
कमी असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला असून त्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अशा स्थिती मध्ये शेतक-यांना ५०० रु. प्रती क्विंटल आर्थिक मदत देवून दिलासा द्यावा असे वाटते. तसेच केंद्र सरकार कडून अजून उपाययोजना करून कांदा बाजारभाव वाढीसाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी केली आहे.

