डॉ. मधुचंद्र भुसारे व डॉ. अक्षय घोरपडे यांनी भाषा अनुवादित माईक प्रणालीचा शोध लावल्याबद्दल भारत सरकारतर्फे मिळाले पेटंट
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.मधुचंद्र भुसारे तसेच जामनेर येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.अक्षय घोरपडे या दोन प्राध्यापकांनी ‘भाषा अनुवादित माईक प्रणालीचा’ शोध लावला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित महाविद्यालयांमध्ये हे प्राध्यापक कार्यरत असून अशा प्रकारचे भारत सरकारतर्फे पेटंट मिळवणारे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मधील मराठी विषयाचे पहिलेच प्राध्यापक आहेत.
हे शोधलेले माईक राजकारणी,सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक तसेच ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांसाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. राजकारणातील लोकांसाठी सीएसआर उपक्रम अनिवार्य आहे. ते आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आणि त्यात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतात.आदिवासी भागातील लोक वेगवेगळ्या प्रदेशात राहतात. त्यांची भाषा, संस्कृती टिकवून ठेवणे, त्याची जगाला ओळख करून देणे आणि शिकवणे आवश्यक आहे.
जगातील सर्व भाषा शिकणे सोपे नाही आणि ते सामाजिक परोपकाराच्या मार्गात येऊ शकत नाही. या संशोधन पेटंटमध्ये यावर क्रियाकलाप केला आहे.
त्यासंदर्भात येथे खुलासा केला आहे. हे पेटंट तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या माईक सिस्टमच्या संदर्भात घोषणा आणि त्यात अंतर्भूत अनुवादक आहे.
ज्या भाषेत बोलेल त्या भाषेचे बोलल्या गेलेल्या भाषेतच रूपांतर करू शकतो किंवा होईल. त्यामुळे कोणत्याही भाषेत संगणकावर, मोबाईलवर माइकमध्ये बोलले जाऊ शकता येईल आणि आउटपुट मध्ये जी भाषा असेल तसेच
प्रेक्षकांना ज्या भाषेतून संबोधित करायचे असेल ती बोललेली भाषा अनुवादित व रूपांतरित होईल त्यामुळे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांशी संवाद साधणे व कोणत्याही भाषा बोलणाऱ्या लोकांसमोर भाषण करणे सोपे होईल. शिक्षित ठिकाणच्या लोकांच्या विकासासाठी याचा वापर करून घेता येईल.
जिथे तंत्रज्ञान अजून वापरले जात नाही त्या भागात याचा वापर सहज शक्य होईल.
डॉ.मधुचंद्र भुसारे व डॉ. अक्षय घोरपडे यांनी केलेल्या व भारत सरकारतर्फे मिळविलेल्या पेटंट संशोधनाचा सर्व सामान्य लोकांना निश्चितच फायदा होणार आहे. त्यांनी मिळवलेल्या या पेटंटबद्दल सर्व स्तरातून व परिसरातून कौतुक होत आहे.