आदिवासी भागातील खुरासाणी पीक
महाराष्ट्रातील दरीखोरीत वसलेल्या अति दुर्गम भागात डोंगराळ भागात दाट झाडी जंगल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा गवत ह्याचे मिश्रण जमिनीत मुरते आणि जमिनीचा पोत सुधारतो ह्याला कोणत्याही रासायनिक खताची गरज नसते. 
ह्या डोंगराळ भागातील जमीन काळी कसदार व खीळवाड जरी असली तरी कोणतेही पीकाची जोमदार वाढ आणि भरघोस उत्पादन मिळते. डोंगराळ भागातील वातावरण दमट व शुष्क असते. अशा वातावरणात भात, नागली, उडीद, तुर खुरासाणी, ज्वारी ही पीक उत्पन्न भरभरून देत असतात.
” पीक खुशीत डोलतया भारी
भरला आनंद समद्या शीवारी
बघुन पाचूचं रान
आमचं हरलं देह भान “
आज रानात गेल्यानंतर खानदेशी कवी. उत्तम कोळगावकर यांच्या कविताच्या ओळी आठवल्या शिवाय राहत नाही.
आज हेमंत ऋतूत निसर्गाच्या सान्निध्यात दरी, डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पीक कणसांनी, टपोऱ्या दाण्यांनी भरून आली आहेत. साधारण वर्षा ऋतूमध्ये जुलै महिन्यात खुरसाणी या पिकाची नांगरणी करून पेरणी केली जाते.
आदिवासी भागात उडीद, तूर पीकाच्या शेतीत खुरसाणी पीकाची मिश्र शेती हे केली जाते. त्याला हळा म्हणतात. खुरसाणी हे गळीताचं धान्य पीक डोंगराळ माळरानावर पीवळ्या फुलांनी बहरून गेली आहेत. ही फुलं आकाराने सूर्यफुलाप्रमाणे लहान असतात. सूर्याचे सोनेरी किरण सकाळी पडले की शोभून दिसतात एकेका मोठ्या खुरसाणी झाडाची उंची तीन फुटांपर्यंत वाढते झाडाला पंचवीस तीस लहान, लहान फुलं येतात.
खूरसाण्याच्या कोवळ्या पानांची भाजी बनवली जाते.बीयांपासून तेल गाळतात बीयांपासून चटणी बनवतात ती कोनत्याही पालेभाजीत मिक्स केल्यावर भाजी रूचकर लागते आदिवासी भागात खुरसाणी पीक ह्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने भरून आली आहेत.
श्री. सुभाष नारायण कामडी (संशोधक)
मो.९५७९५४३३०८

