कृषी गौरव शेतकरी पुरस्कार समारंभाने झाली रेणुका कृषी प्रदर्शनाची सांगता…
चांदवड येथे चालू असणाऱ्या रेणुका कृषी प्रदर्शननाच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांमध्ये त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, मका, टोमॅटो, ऊस याबरोबरच इतर पिकांमध्ये एकरी जास्तीत जास्त उत्पन्न घेतलेले शेतकरी तसेच गोपालन, पशुपालन, कुक्कुटपालन, मच्छी पालन, असे वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय करणारे शेतकरी, महिला बचत गट उद्योजक महिला यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनामधून कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शनाचे मार्गदर्शक आमदार श्री. राहुल दादा आहेर व निमंत्रक डॉक्टर श्री. आत्माराम कुंभार्डे यांच्या वतीने सर्वांनाच कृषी गौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या पाच दिवस चालणारे या प्रदर्शनाला चांदवडसह नाशिक जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली तालुक्यामध्ये प्रथमच कृषी प्रदर्शन अत्यंत आकर्षक व विविधतेने नटलेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मनापासून भारावून गेले येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे प्रवेशद्वारावरती आयोजकांच्या वतीने स्वागत होत होते शेतकऱ्याची नोंदणी करून त्यांना लकी ड्रॉ द्वारे शेती उपयोगी साहित्य दररोज भेट देण्यात येत होते महिला शेतकऱ्यांसाठी वेगळा ड्रॉ काढून झांबरे पैठणी यांच्या वतीने पैठणी साडी भेट देण्यात येत होती.
त्याचबरोबर प्रत्येक स्टॉल वरती शेतकऱ्यांना विविध कंपन्यांच्या द्वारे नवनवीन तंत्रज्ञांची माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळत होती. प्रदर्शनामध्ये दररोज विविध विषयांवर पीक परी संवाद त्याचबरोबर महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्यामुळे खास महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामुळे अत्यंत आगळेवेगळे असणारे हे प्रदर्शन जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आदर्श प्रदर्शन ठरले सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थांच्या वतीने आयोजक संयोजकांचे शेतकऱ्यांनी कौतुक केले. व अनेक जणांनी असे प्रदर्शनाने प्रत्येक तालुक्यात घेण्यात यावे अशी इच्छाही व्यक्त केली या प्रदर्शनाचे अत्यंत यशस्वीपणे नियोजन करणारे वाबळेज इव्हेंटचे श्री. अजय वाबळे यांचाही तालुक्याचे आमदार राहुल दादाआहेर यांच्या वतीने सन्मान करून त्यांनाही गौरवण्यात आले.
चालू वर्षी पडलेला दुष्काळ हवामानामध्ये सातत्याने होणारे बदल, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी भरडला जात आहे शेतकऱ्याला आलेल्या निराशातून बाहेर काढून त्याला नवी उभारी देण्याच्या उद्देशातून कृषी प्रदर्शनाची संकल्पना सुचली पहिल्याच वर्षी घेतलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला त्यामध्ये वाबळेज इव्हेंटचे अजय वाबळे यांनी अत्यंत मेहनत घेतली. अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतीची माहिती येथे मिळाली ग्रामीण भागातील शेतकरी महिला भगिनींसाठी एक वेगळे व्यासपीठ उभे करता आले याचं मनापासून समाधान होत आहे. भविष्यामध्ये प्रत्येक वर्षी शेतकरी हिताचे कृषी प्रदर्शननाचे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करणार आहे
डॉक्टर आत्माराम कुंभार्डे


