[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

नाशिकच्या सहयाद्री प्रतिष्ठाने केले किल्ले इंद्राईचे संवर्धन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

नाशिकच्या सहयाद्री प्रतिष्ठाने केले किल्ले इंद्राईचे संवर्धन

शेकडो वर्ष उलटून गेलीत आहेत.. असंख्य सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान , नाशिक विभागगडकोट आजही परकीयांच्या जुलमी आक्रमनामुळे तसेच वारे – वादळ – पाऊस यांना झेलता झेलता आपले अस्तित्व मातीच्या ढीगाऱ्याखाली गमावून बसले आहेत. सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पराक्रमी स्वराज्य रक्षक गडकिल्यानां त्यांचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम करत आहे त्यांचे संवर्धन आहोरात्र नं दिवस करत आहे.
असाच एक दुर्ग किल्ले इंद्राई
साक्षात इंद्राचा वास असावा असा प्रशस्त,बेलाग – कणखर दुर्ग किल्ले इंद्राईचा प्रवेशद्वार व पायरी मार्ग गेल्या शेकडो वर्षांपासून मातीच्या व तटबंदीच्या दगडाखाली गाडला गेला होता. गेल्या 2 महिन्यात दोन संवर्धन मोहिम हाती घेऊन किल्ले इंद्राईला त्याचे प्रवेशद्वार परत मिळवून देण्यात यशस्वी ठरले. मातीत गाडला गेलेला प्रवेशद्वार तसेच पुन्हा नव्याने आपला पराक्रमी इतिहास अभिमानाने सांगन्यासाठी सज्ज झाला आहे. दुर्गसेवकांच्या अथक मेहणीतून प्रवेशद्वाराने घेतलेला मोकळा श्वास पाहून दुर्गसेवक सुखावले आहेत. सर्व दुर्गसेवकांच्या कष्टाचे चीज झाले. यावेळी प्रवेशद्वाराची पुष्प हार घालून, भंडाऱ्याची उधळण करून जल्लोषात किल्ले इंद्राईला दिलेले संवर्धनाचे वचन पूर्ण करून पुढील संवर्धन कार्याची शपत घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली.
ह्या परम पवित्र कार्यात आपले कष्ट पणाला लावणाऱ्या सर्व दुर्गसेकांचा सार्थ अभिमान आहे.
सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान , नाशिक विभागने हे काम केलें.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या